‘एच-१ बी’साठी दहा डॉलर शुल्कवाढ

H-1B
H-1B

वॉशिंग्टन - अमेरिकी प्रशासनाने ‘एच-१ बी’ व्हिसाच्या अर्जाचे शुल्क दहा डॉलरने वाढवले आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिसा खूप महत्त्वाचा असतो. अमेरिकेतील कंपन्यांना परदेशी नागरिकांना अमेरिकेत तज्ज्ञ पदावरील नोकऱ्या देण्यासाठी किंवा ठरावीक कार्यकालासाठी काम देण्यासाठी ‘एच-१ बी’ व्हिसाची आवश्‍यकता असते. 

अमेरिकेतील तंत्रज्ञानविषयक कंपन्या दरवर्षी भारत आणि चीनसारख्या देशांमधून मिळणाऱ्या हजारो तंत्रज्ञानविषयक मनुष्यबळावर अवलंबून असतात. ‘एच-१ बी’ व्हिसाच्या अर्जासाठीचे शुल्क हे परत केले जात नाही. नव्या इलेक्‍ट्रॉनिक नोंदणी यंत्रणेसाठीच्या खर्चाची तरतूद म्हणून हे शुल्क वाढवण्यात आल्याचे ‘यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ने म्हटले आहे. ‘एच-१ बी’ व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आधी इलेक्‍ट्रॉनिक नोंदणी करणे आवश्‍यक असते. अमेरिकन प्रशासनाकडून नव्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील निर्णय झाल्यांनतर संबंधित माहिती जाहीर केली जाणार आहे.

नव्या प्रस्तावित नियमांची सूचना, ज्यात नव्या नोंदणी शुल्काचाही समावेश आहे, ती ४ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतरच्या ३० दिवसांत नागरिकांकडून त्यावर प्रतिक्रिया मागवण्यात आल्या होत्या. अमेरिकी प्रशासनाकडे ४ सप्टेंबरनंतरच्या ३० दिवसांच्या कालावधीत फक्त २२ प्रतिक्रिया आल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com