दहशतवाद हा समान धोका : भारत

इस्राईलच्या दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी आज येथील भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला.
global
globalsakal

जेरुसलेम : भारत आणि इस्राईलला कट्टरतावाद आणि दहशतवाद यांच्यापासून सारखाच धोका असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज येथे सांगितले. इस्राईलच्या दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी आज येथील भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला.

जयशंकर म्हणाले,‘‘गेल्या चार वर्षांत मी तिसऱ्यांदा इस्राईलला आलो आहे. मात्र, दरवेळी मायदेशी जाताना दौरा अपूर्ण राहिल्याची भावना होत होती. इस्राईल समजून घेण्यासाठी येथे वारंवार येणे गरजेचे आहे. भारतीय ज्यू समुदायाने दोन देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यात अत्यंत मोलाची भूमिका निभावली आहे. अनेक शतकांपासूनचे हे संबंध कायम ठेवणे आवश्‍यक आहे. गेल्या काही वर्षांत भारत-इस्राईल संबंध वेगाने सुधारले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com