मोसूलध्ये इसिसकडून हत्याकांड

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

जीनिव्हा : इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने गेल्या आठवड्यात इराकमधील मोसूलमधून पलायन करणाऱ्या 163 नागरिकांचे हत्याकांड केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीने मंगळवारी केला.

जीनिव्हा : इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने गेल्या आठवड्यात इराकमधील मोसूलमधून पलायन करणाऱ्या 163 नागरिकांचे हत्याकांड केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीने मंगळवारी केला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीचे प्रमुख झैद राद अल हुसेन म्हणाले, ''इसिस आणि अन्य दहशतवादी संघटनेच्या क्रौर्याला कोणीतीही सीमा राहिलेली नाही. पश्‍चिम मोसूलमध्ये इराकी नागरिक, महिला आणि मुलांचे मृतदेह अद्याप रस्त्यावर पडले आहेत, अशी माहिती मला मिळाली. मोसूलमधून पलायन करणाऱ्या 163 नागरिकांचे हत्याकांड इसिसने केले आहे. तसेच, या भागातील अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. हे हत्याकांड 1 जूनला झाल्याचे समजते.''

इसिसने 2014 मध्ये मोसूलचा ताबा घेतला होता. इसिसच्या ताब्यातून मोसूल सोडविण्याची मोहीम गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये सुरू झाली. यामुळे तेथील हजारो नागरिक घर सोडून पलायन करीत आहेत. इराकच्या सैन्याने मोसूलच्या काही भागाचा ताबा मिळविला आहे. मात्र, दहशतवादी त्यांना कडवा प्रतिकार करीत आहेत. तसेच, मानवी ढालीचा बचावासाठी ते वापर करीत आहेत.

दोन लाख नागरिक अडकले
इसिसच्या ताब्यात असलेल्या भूभागावर मे महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण दोन लाख नागरिक अडकले आहेत. त्यांच्यासमोर अन्न, पाणी आणि औषध टंचाईचे संकट असून, शहरातील संघर्षामुळे त्यांच्या जीविताला धोका आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे.

Web Title: Terrorism ISIS Mosul Iraq UN Human Rights Gloabl news international news marathi news