थायलंडच्या गुहेत अडकलेल्या फुटबॉलपट्टूंची होणार सुटका ?

वृत्तसंस्था
रविवार, 8 जुलै 2018

गेल्या काही दिवसांपासून फुटबॉल टीममधील 12 फुटबॉलपट्टू आणि त्यांचे प्रशिक्षक थायलंडच्या एका गुहेत अडकल्याचे समोर आले. या सर्वांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 

नवी दिल्ली : थायलंडच्या गुहेत अडकलेल्या 12 ज्युनिअर फुटबॉलपट्टू आणि त्यांच्या प्रशिक्षकाला गुहेतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आज (रविवार) रात्री 9 वाजेपर्यंत यामध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात यश येईल, अशी माहिती बचावकार्याच्या प्रमुखांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून फुटबॉल टीममधील 12 फुटबॉलपट्टू आणि त्यांचे प्रशिक्षक थायलंडच्या एका गुहेत अडकल्याचे समोर आले. या सर्वांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 13 विदेशी आणि 5 थायलंडच्या नेव्ही सीलच्या पथकाला पाठविण्यात आले आहे. यामध्ये दोन मुलांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. मात्र, या मुलांना बाहेर काढण्यासाठी सुमारे 11 तास लागण्याची शक्यता आहे. यामध्ये अडकलेले सगळी मुले एकत्र बाहेर येऊ शकत नाहीत. याबाबतचे बचावकार्य दोन ते चार दिवस चालण्याची शक्यता आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thailand cave rescue operation first boy is expected to brought out from cave today

टॅग्स