निएंडरथलच्या काळापासून खाल्ली जातेय आमटी -चपाती? संशोधकांचा अजब शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neanderthal human

Dal Roti : निएंडरथलच्या काळापासून खाल्ली जातेय आमटी -चपाती? संशोधकांचा अजब शोध

The Archeology Department Found Samples Of Vegetarian Meals : साधारण ७० हजार वर्षांपासून म्हणजे निएंटर थल या मानव प्रजातीपासून आमटी, चपाती खाल्ली जाते याचे पुरावे मिळाले आहेत. पुरातत्व विभागाला एका गुफेत जळालेल्या जेवणाचे नमुने मिळाले आहेत. या राखेत चपाती आणि आमटीचे पुरावे सापडले आहेत.

असं सांगितलं जात आहे की, हे नमुने निएंडरथल मानवाच्या काळातले आहेत. साधारण ७० हजार वर्षांपुर्वीचे असून ते इराक मधल्या ग्रीस फ्रांच्थी गुफेतून मिळाले आहेत.

या जळालेल्या अन्नाच्या राखेत विविध बिया, जंगली डाळी, जंगली सरसो, शेंगा आणि चाऱ्याचं मिश्रण मिळालं आहे. हे बघून संशोधकांनी अनुमान लावला आहे की, यापासून आमटी चपाती बनवली जात असावी. असं मानलं जातं की, कोण्या एका काळी ही शनिदार गुफा निएंडरथल मानवाची आधुनिक वस्ती होती.

हेही वाचा: Eating Habits: चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती?

Archeological work at Shanidar Cave, Bagdad

Archeological work at Shanidar Cave, Bagdad

आजवर असं मानलं जायचं की, त्यावेळचे प्राचीन मानव फक्त मांसच खायचे. पण यातून हे सिध्द होत आहे की, त्यांच्या जेवणात वैविध्य होतं. ते सर्व प्रकारचे अन्न खात होते. संशोधकांनी बगदादच्या शनिदार गुफेतून आणि ग्रीसच्या फ्रांच्थी गुफेतून एकूण ९ नमुने गोळा केले आहेत.

हेही वाचा: Diet : दूध-चपाती खाण्याचे असे आहेत फायदे

मग त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली स्कॅन करण्यात आलं. त्यानंतर समजलं की, त्यात डाळी, धान्य, सरसो, शेंगा आणि खाण्यायोग्य अशा गवताचा/चाऱ्याचा त्यात समावेश होता. यापैकी पाच फूडग्रेंस शनिदार मधून मिळाले आहेत.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2022 : चपाती-भाकरी व्यवसायातून रोजीरोटी

संशोधकांनी सांगितलं की, या जळालेल्या तुकड्यांचे नमुने एवढे दाट होते की, त्यावरून समजतं ही डाळ (आमटी) किती घट्ट असेल. फ्रांच्थी मधून मिळालेल्या शाकाहारी जेवणाचे नमुने सगळ्यात जुने आहेत. ते साधारण १२-१३ हजार वर्ष जुने असतील. आता या जेवणाच्या नमुन्यांनी हे समजतं की, निएंटरथल मानव जेवण शिजवत असे. आता तो अन्न शिजवायचा कसा याविषयी संशोधन सुरू आहे.

फ्रांच्थी गुफेत मिळालेल्या चपातीच्या नमुन्यावरून धान्याला दळून त्याच्या पिठापासून ती बनवली असल्याचं समजतं. म्हणजे निएंडरथल मानवाला चपाती शेकण्याची पध्दत माहित होती. याचाच अर्थ मध्य आणि उत्तर पॅलियोलिथिक काळात अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पध्दती विकसित झालेल्या होत्या. ते अन्न सालीसहित बनवत असल्याचं दिसतं.

टॅग्स :Archeology