अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव; ट्रम्प यांची टीका

डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानच्या धोरणांवरून बायडेन प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे.
Donald Trump
Donald TrumpSakal

वॉशिंग्टन - कोणत्याही प्रतिकारविना तालिबानला काबूलवर ताबा मिळणे हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव असल्याचे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानला ज्या रीतीने वाऱ्यावर सोडले, ते ऐतिहासिक आहे, अशा शब्दात ट्रम्प यांनी टीका केली आहे.

Donald Trump
चीन तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी तयार

डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानच्या धोरणांवरून बायडेन प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे. त्याचवेळी माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि निक्की हेली यांनी देखील बायडेन यांच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला आहे. ट्रम्प यांनी बायडेन यांच्या राजीमान्याची मागणी करत म्हटले की, बायडेन यांनी अफगाणिस्तानसमवेत जे धोरण राबविले ते खरोखरच ऐतिहासिक आहे. बायडेन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. कारण अफगाणिस्तानात जे होऊ द्यायचे नव्हते, ते सर्वकाही घडले आहे.

Donald Trump
अमेरिका तालिबानच्या राजवटीला मान्यता देईल, पण....

काबूल तालिबानच्या ताब्यात जाणे हे बायडेन सरकारचे मोठे अपयश असल्याचे सांगत निक्की हेली म्हणाल्या, की तेथून सुरक्षितपणे निघण्यासाठी तालिबानला भीक मागणे देखील दुर्दैवी आहे. ज्या अमेरिकी सैनिकांनी अफगाणिस्तानसाठी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांनी देखील अशा स्थितीची कल्पना केली नसेल. माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटले की, सध्या मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या कमांडर इन चीफसमवेत मंत्री असतो तर अमेरिकेविरोधात कट रचण्याचे काय परिणाम असतात, हे तालिबानला दाखवून दिले असते. कासीम सुलमानी याला धडा शिकवला होता. तालिबानला देखील अमेरिकेने हिसका दाखवला आहे.

Donald Trump
VIDEO : तालिबानींची दहशत, नागरिकांचा विमानाला लटकून प्रवास

तालिबानकडून भीक मागितलेली नाही

विद्यमान परराष्ट्रमंत्री ॲटोनी ब्लिंकन यांनी म्हटले की, आपण तालिबानकडून काहीही मागितलेले नाही. आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा कामात हस्तक्षेप केल्यास त्यास मुंहतोड जबाब दिला जाईल, असे अमेरिकेने अगोदरच तालिबानला बजावले आहे. तालिबान सरकारला मान्यता देण्याबाबत ब्लिंकन म्हणाले की, भविष्यातील सरकार जे महिलांच्या मूळ हक्काचे संरक्षण करत नाही, दहशतवाद्यांना थारा देते आणि अमेरिका किंवा सहकारी देशांविरोधात कटकारस्थान रचणारे असेल तर मान्यता देण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही.

ज्यो बायडेन सुटीवर

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन सध्या कॅम्प डेव्हिड येथे सुटीवर आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी अफगाणिस्तानातील सध्याच्या स्थितीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर सोमवार दुपारपर्यंत व्हाइट हाऊसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com