श्रीमंतांचे इतर देशात स्थलांतर; भारत-चीन आघाडीवर

flight
flight

नवी दिल्ली- 2019 मध्ये जवळपास 7 हजार श्रीमंत भारतीय ( high net worth individuals) दुसऱ्या देशाचे रहिवाशी झाल्याचे एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे. AfrAsia बँकेच्या अभ्यासानुसार, दुसऱ्या देशात स्थलांतरित झालेल्या देशांच्या यादीत चीन आणि भारताचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लागतोय. चीनच्या 16 हजार श्रीमंत नागरिकांनी दुसऱ्या देशात स्थलांतर केल आहे. अभ्यासात 8 ते 80 कोटींची संपत्ती असलेल्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश करुन घेण्यात आला होता. ते दुसऱ्या देशाचे रहिवाशी तरी झालेत, किंवा 6 महिने तरी त्या देशात राहिले आहेत. (The places that rich people are leaving China and India top the list)

कोट्यधींशाच्या या स्थलांतरामुळे भारत आणि चीनच्या 2 टक्के श्रीमंतामध्ये घट झालीये. तर, रशिया आणि तुर्की या देशांच्या श्रीमंतांमध्ये अनुक्रमे 6 ते 8 टक्क्यांची घट झाली आहे. नवीन कामाची संधी, कर चुकवणे आणि आर्थिक कारणांमुळे या श्रीमंतांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं रिपोर्ट सांगतो. याशिवाय खासगी कारणासाठीही हे स्थलांतर झालेलं असू शकतं. यात चांगल्या आरोग्य सुविधा, चांगले शिक्षण, सुरक्षा आणि चांगले राहणीमान या गोष्टींचा समावेश होतो. सरकारच्या दडपाशाहीमुळे देश सोडण्याचे प्रमाणही जास्त आहे.

flight
मृत्यूला कोरोना लस कारणीभूत; भारतात झाली पहिली नोंद

ऑस्ट्रेलिया इतर देशातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. जवळपास 12 हजार श्रीमंतानी ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर केले आहे. यात अमेरिका आणि स्वित्झर्लँड दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर येतात. अमेकिकेत 10,800 आणि स्वित्झर्लंडम्ये 4 हजार लोकांनी स्थलांतर केले आहे. पोर्तुगाल आणि ग्रीस यांचाही समावेश श्रीमंतांना आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये होतो. दोन्ही देश श्रीमंताना यूरोपीयन युनियनचे निवासित्व आणि नागरिकत्व देत आहेत. जवळपास 30 टक्के श्रीमंत इनवेस्टर व्हिसा वापरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com