या देशातून भारतीय नागरिकांची होणार एअरलिफ्ट

Plane
Plane

नवी दिल्ली - लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची वंदे भारत मोहिम राबविण्यात येत असून यातंर्गत सिंगापूरहून आज २३४ भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले. यापूर्वी एअर इंडियाने लॉकडाउनच्या काळात ९ हजार भारतीयांना आणले आहे. त्याचबरोबर दुबई, यूएई आणि बांगलादेशमधून भारतीयांना परत आणण्यात आले. 

एअर इंडियाचे बी-७३७ विमान २३४ जणांना घेऊन आज सकाळी ११.४५ वाजता दिल्ली विमानतळावर पोचले.विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करण्यात आले. विमानातील कर्मचारी आठ तासाहून अधिक काळ पीपीईच्या पेहरावात होते.  तसेच मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू राबविले जाणार आहे. 

भारतीय नौदल आयएनएस जलाश्‍वच्या माध्यमातून ७५० भारतीयांना परत आणण्याची तयारी करत आहे. या नागरिकांना कोचीत आणले जाणार आहे. दरम्यान, हैदराबाद येथे अडकलेल्या ३२ केनियन नागरिकांना विशेष विमानाने एअरलिफ्ट करण्यात आले.

बांगलादेशातून १६८ विद्यार्थी परतले
कोरोना संसर्गामुळे बांगलादेशात अडकलेले १६८ भारतीय विद्यार्थ्यांचा पहिला जत्था एअर इंडियाच्या विशेष विमानाने मायदेशी दाखल झाला. हे विमान थेट श्रीनगरला पोचणार आहे. या विद्यार्थ्यांना अभियान वंदे भारत-स्वदेस वापसी मोहिमेतंर्गत आणले जात आहे. 

दुबई, यूएईतून ३६३ मायदेशी
वंदे भारत मोहिम सुरू होण्यापूर्वीच सात मे रोजी एअर इंडियाचे विमान अबुधाबील पोचले होते. तेथून १७७ प्रवासी आणि चार नवजात बालकांना कोची येथे उतरवण्यात आले. त्याचवेळी दुसरे विमान १७७ प्रवासी आणि पाच नवजात बालकांना घेऊन कोझिकोड येथे उतरले. 

वंदे भारत योजना म्हणजे काय
केंद्र सरकारच्या वंदे भारत योजनेनुसार १२ देशातील १४,८०० भारतीयांना मायदेशी आणले जाणारआहे. दोन एअरलाइन्स सात दिवसात ६४ उड्डाणे करणार आहे. अमेरिकेत भारतीयांची घरवापसी ९ मे पासून सुरू हेणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ ते १५ मेपर्यंत अमेरिकेत अनेक शहरातून भारतातील शहरापर्यंत कमर्शियल फ्लाइट सेवा सुरू होत आहे. या उड्डाणात प्रवाशांची संख्या मर्यादित राहणार आहे. त्यामुळे वंदे भारत योजनेत विद्यार्थी, गर्भवती, ज्येष्ठ नागरिक आणि व्हिसा संपलेल्या नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. 

किती भाडे आकारणार
भारताची वंदे भारत अभियान हे जगातील सर्वात मोठ्या एअरलिफ्ट मोहिमेपैकी एक मानले जात आहे. या अभियानातून हजाराे भारतीयांना मायदेशी आणणार आहेत. घरवापसी करणाऱ्या भारतीयांकडून भाडे घेतले जाणार आहे. अमेरिकेहून येणाऱ्या भारतीयांकडून एक लाखांपर्यंत भाडे द्यावे लागणार आहे. ब्रिटनहून येणाऱ्यांकडून ५० हजार, बांगलादेशहून येणाऱ्यांकडून १२ हजार तर तेथूनच कोचीला जाणाऱ्यांकडून १५ हजार भाडे वसूल केले जाणार आहे. त्यानुसार आखातातून येणाऱ्या भारतीयांकडून प्रत्येकी पंधरा हजार भाडे घेतले आहे. 

कोठून येणार भारतीय
अमेरिका, ब्रिटन, बांगलादेश, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, युएई, सौदी अरेबिया, कतार, बहारिन, कुवेत, ओमान येथून भारतीयांना आणण्यात येत आहे. पहिल्या दिवशी अबूधाबी, दुबई, रियाध, दोहा लंडन, सॅन फ्रान्सिस्को, सिंगापूर, क्वालांलपूर, ढाका आणि मनिला येथून २३०० भारतीयांना आणले जात आहे. दुसऱ्या दिवशी बहारिन, कुवेत येथून दोन हजार भारतीयांना तर तिसऱ्या दिवशीच एवढेच भारतीयांना आणले जाणार आहे. चौथ्या दिवशी वॉशिंग्टनसह अनेक ठिकाणांहून १८०० जणांना आणण्यात येणार आहे. याप्रमाणे पाचव्या दिवशी दोन हजार भारतीयांना टप्प्याटप्याने आणले जाणार आहे. सहाव्या दिवशी २५०० भारतीयांना आणि सातव्या दिवशी २ हजार भारतीयांना आणण्याचे नियोजन आहे.

यूएई - 10
अमेरिका - 7
मलेशिया - 7
सौदी अरेबिया - 5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com