कोट्यवधी किंमतीचे 'अल थानी' दागिने लंपास

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

रोम (इटली) - व्हेनिस पॅलेस येथे नुकतेच दागिन्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, काल (गुरुवार) या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने प्रदर्शन बघण्यासाठी झालेल्या गर्दिचा फायदा घेत चोरट्यांनी या प्रदर्शनातील दागिने लंपास केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये भारतीय नक्षीकामाच्या 'अल थानी' दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये एक ब्रुच, तसेच एक झुमक्यांचा जोड आहे. 'अल थानी' बनावटीचे हे दागिने अत्यंत मोहक आणि आकर्षक आहेत. त्यांची किंमत लाखो युरोंच्या घरात आहे. हे दागिने सोने, प्लॅटिनम आणि हिऱ्यांनी मढवण्यात आले होते. त्यामुळे या दागिन्यांची किंमत भारतीय चलनाप्रमाणे कोट्यवधींच्या घरात आहे. 

स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास प्रदर्शनातला अलार्म वाजला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सगळ्या परिसरात नाकाबंदी केली. मात्र तोपर्यंत चोर दागिने घेऊन पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

इटलीची मुख्य वृत्तसंस्था 'एएनएसए'ने दिलेल्या माहितीनुसार, प्रदर्शनातील सुरक्षा अलार्म वाजण्यात उशीर झाल्याने चोरांना पळून जाता आले. 

प्रदर्शनात असलेले अल थानी दागिने हे जगात सर्वाधिक सुंदर आणि कोरीव काम असलेले दागिने आहेत. त्याच्या नक्षीकामाला तोड नाही असे मत 'फोर्ब्स मॅगझिन'ने नोंदवले आहे. व्हेनिस पॅलेसमध्ये अल थानी दागिन्यांचे 270 दागिने आहेत. ज्यापैकी 2 दागिने चोरट्यांनी लांबवले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves steal Indian jewels from Venice exhibition