9 दिवसांपासून गुहेत अडकलेले 12 फुटबॉलर्स जिवंत

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

मे साय (थायलंड) - गेल्या 9 दिवसांपासून थायलंडच्या गुहेत अडकलेले 12 जुनिअर फुटबॉलर आणि त्यांचे प्रशिक्षक जिवंत सापडले आहेत. 11 ते 16 वर्षे वयोगटातील हे फुटबॉलर्स फक्त पाण्याच्या मदतीने जिवंत आहेत. ही अंडर-16 फुटबॉल टीम असून, सराव करत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने त्यांनी जवळ असलेल्या गुहेत आश्रय घेतला. परंतु, पाऊस वाढत गेल्याने पूर आला आणि तब्बल 10 किमी लांब गुहा बंद झाली. बचाव कार्याच्या 10 व्या दिवशी हे सर्वजण जिवंत सापडले आहेत. तब्बल 1200 जवान त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे बचाव पथक अजुनही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही.

या टिमचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बचाव कार्य करणाऱ्या पथकाच्या कॅमेऱ्याने टिपला आहे. यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे या पथकाला शक्य झाले आहे. तेव्हा आत किती जण आहेत. ते कसे आहेत याबाबतची माहिती मिळू शकली आहे.

गेल्या 7 दिवसांपासून गुहेतून पुराचे पाणी बाहेर काढले जात आहे. याशिवाय त्यांना बाहेर काढण्यासाठी निश्चित ठिकाणी छिद्र पाडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गुहेत ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये यासाठी 200 ऑक्सिजन सिलेंडर टाकण्यात आले आहेत. ही गुहा म्यानमार आणि लाओस सीमेवर आहे.

या खेळाडूंना बाहेर काढण्याच्या मोहिमेने आंतरराष्ट्रीय स्वरुप घेतले आहे. अमेरिकेच्या तज्ञांची सुद्धा यामध्ये मदत घेतली जात आहे. गुहेच्या आतील भाग पूर्णपणे चिखलमय झाला आहे. लहान मुले गुहेतील दलदलीवर असलेल्या एका पठारावर आहेत. परंतु, जास्त काळ तेथे बसणे शक्य नाही. सोबतच या गुहेत अनेक छोटे-छोटे मार्ग असून ते कयेक किमी लांब आहेत. अशात खेळाडू त्यामध्ये भटकू नयेत अशी प्रार्थना केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thiland Football Team Found Alive After 9 Days In Cave