ऑस्ट्रेलियातील मंत्र्याचा दुहेरी नागरिकत्वामुळे राजीनामा

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

"मी जेव्हा 25 वर्षांचा होतो, त्या वेळी माझ्या आईने इटालीच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता; मात्र त्याबाबत मला काहीही माहिती नाही,'' असे कॅनव्हान म्हणाले. ऑस्ट्रेलियातील ग्रीन पार्टीच्या दोन संसद सदस्यांना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून राजीनामा द्यावा लागलेला आहे

सिडनी - दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून ऑस्ट्रेलियातील एका मंत्र्याला आज राजीनामा द्यावा लागला असून, अशा प्रकारे राजीनामा देणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या तीनवर पोचली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मंत्रिमंडळातील मॅथ्यू कॅनव्हान असे आज राजीनामा दिलेल्या मंत्र्यांचे नाव असून, त्यांच्याकडे इटालीचे नागरिकत्व असल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर दुहेरी नागरिकत्वामुळे कॅनव्हान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दुहेरी किंवा अनेक देशांचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियातील संसदेवर निवडून येण्यास अपात्र मानले जाते.

मी इटालीचा नागरिक आहे याबाबत मी अनभिज्ञ होतो. मी कधीही त्यासाठी अर्ज केलेला नाही, असे सांगत कॅनव्हान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्ती मंत्रालयाची जबाबदारी कॅनव्हान यांच्याकडे होती.

"मी जेव्हा 25 वर्षांचा होतो, त्या वेळी माझ्या आईने इटालीच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता; मात्र त्याबाबत मला काहीही माहिती नाही,'' असे कॅनव्हान म्हणाले. ऑस्ट्रेलियातील ग्रीन पार्टीच्या दोन संसद सदस्यांना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून राजीनामा द्यावा लागलेला आहे.

Web Title: Third Australian politician hit by dual citizenship row