उपग्रहात बिघाड झाल्याने इंडोनेशियातील एटीएम बंद

वृत्तसंस्था
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

"टेलिकॉम-1' या उपग्रहात बिघाड झाला असल्याने संपूर्ण देशातील 15 हजार एटीएम यंत्रांना फटका बसला आहे. ही उपग्रह सेवेचा लाभ सरकारी संस्था, बॅंका, प्रसारमाध्यमे व अन्य कंपन्या घेतात

जकार्ता - उपग्रहामध्ये बिघाड झाल्यामुळे इंडोनेशियातील सर्व एटीएम व इलेक्‍ट्रॉनिक कार्ड पेमेंट यंत्रणा बंद आठवडाभर बंद आहेत. ही सेवा पूर्णपणे सुरू होण्यास अजून दोन आठवडे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

इंडोनेशिया सरकारच्या अखत्यारितील " पीटी टेलिकम्युनिकेसी इंडोनेशिया (टेलिकॉम)' या दूरसंचार कंपनीच्या मालकीच्या "टेलिकॉम-1' या उपग्रहात बिघाड झाला असल्याने संपूर्ण देशातील 15 हजार एटीएम यंत्रांना फटका बसला आहे. ही उपग्रह सेवेचा लाभ सरकारी संस्था, बॅंका, प्रसारमाध्यमे व अन्य कंपन्या घेतात, असे "टेलिकॉ'चे अध्यक्ष संचालक अलेक्‍स सिनागा यांनी सांगितले.

या उपग्रहाच्या अँटेनाची दिशा बदलल्याने सेवेत व्यक्तय आला. गेल्या शुक्रवारी हा बिघाड लक्षात आला.

Web Title: Thousands of ATMs go down in Indonesia