#NoFault | 10,000 हून जास्त जणांनी मागितली लशींच्या दुष्परिणामांची भरपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

10,000 हून जास्त जणांनी मागितली लशींच्या दुष्परिणामांची भरपाई

sakal_logo
By
ओमकार वाबळे

देशभरात कोरोना लसीकरण मोठ्या गतीने सुरू असतानाच ऑस्ट्रेलियातून अजब बातमी आली आहे. लस घेतल्यमुळे झालेल्या नुकसानासाठीभरपाई मागितीलय. सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील एका अहवालानुसार, हजारो लोकांनी फेडरल सरकारच्या नो-फॉल्ट नुकसानभरपाई योजनेअंतर्गत नुकसानभरपाईचा दावा करण्यासाठी नोंदणी केली आहे.

यामध्ये कोरोना काळात उपचार घेताना पगार न मिळणे, नोकरी जाणे यासंबंधी सुद्धा नुकसान भरपाई मागण्यात आली आहे. या योजेसाठी जवळपास 10 हजार नागरिक क्लेम करण्याची शक्यता आहे.

कोविड-19 लस जॅब्सच्या दुर्मिळ दुष्परिणामांमुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 10,000 हून अधिक लोक गमावलेल्या उत्पन्नाच्या भरपाईसाठी दावा करण्याची शक्यता आहे. ही नुकसानभरपाई 5,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स असणार आहे. यामध्ये वैद्यकीय खर्च आणि नोकऱ्या गमावल्यानंतर कमी झालेल्या वेतनाचा समावेश आहे.

ब्लूमबर्गच्या मते, सगळे क्लेम मान्य झाल्यास सरकारच्या तिजोरीवर 50 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा बोजा वाढेल. ऑस्ट्रेलियाच्या थेरप्युटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशनला (TGA) लसीच्या 36.8 दशलक्ष डोसमधून दुष्परिणामांचे जवळपास 79,000 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यांच्या वेबसाइटनुसार, वारंवार नोंदवलेले दुष्परिणाम म्हणजे हात दुखणे, डोकेदुखी, ताप आणि थंडी वाजून येणे, हे होते.

loading image
go to top