रेक्स टिलर्सन अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री

पीटीआय
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन- एक्सॉन मोबीलचे माजी अध्यक्ष रेक्स टिलर्सन यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रिपदाची शपथ घेतली. सिनेटने सकाळी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश निश्चित झाला. 

व्हाईट हाऊसच्या ओव्हल हाऊसमध्ये शपथविधी समारंभ पार पडल्यानंतर बोलताना ते म्हणाले, "पश्चिम आशिया आणि भवतालच्या जगात प्रचंड आव्हाने आपल्यासमोर असली तरी अत्यंत बिकट काळात आपण शांतता आणि स्थैर्य मिळवू शकतो यावर माझा विश्वास आहे."

सिनेटने 56-43 अशा मतांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर 64 वर्षीय टिलर्सन यांना उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. व्हाईट हाऊस आणि रिपब्लिक पक्षाच्या वतीने त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. सिनेटमधील डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी मात्र टिलर्सन यांचे रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांच्याशी असलेल्या संबंधांवरून त्यांना विरोध दर्शविला. 

Web Title: Tillerson sworn-in as US secretary of state