टाईम मासिकाची विक्री तब्बल 19 कोटी डॉलरमध्ये

वृत्तसंस्था
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

जगप्रसिद्ध 'टाइम' मासिक विक्री करण्यात आली आहे. 'मेरेडिथ कॉर्प' या अमेरिकी कंपनीने 'सेल्सफोर्स' कंपनीला 'टाइम' मासिक 19 कोटी डॉलरमध्ये विकले आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 1368 कोटी रुपये एवढी मोठी आहे. 'सेल्सफोर्स'चे सह-संस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी आता 'टाइम' मासिकाचे नवे मालक असणार आहेत.

वॉशिंग्टन- जगप्रसिद्ध 'टाइम' मासिक विक्री करण्यात आली आहे. 'मेरेडिथ कॉर्प' या अमेरिकी कंपनीने 'सेल्सफोर्स' कंपनीला 'टाइम' मासिक 19 कोटी डॉलरमध्ये विकले आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 1368 कोटी रुपये एवढी मोठी आहे. 'सेल्सफोर्स'चे सह-संस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी आता 'टाइम' मासिकाचे नवे मालक असणार आहेत.

'सेल्सफोर्स'च्या चार सह-संस्थापकांपैकी एक मार्क बेनीऑफ आणि त्यांच्या पत्नीने हे मासिक विकत घेतले आहे. सेल्सफोर्स ही 'क्लाउड कंप्यूटिंग' मधील दिग्गज कंपनी आहे. 190 मिलियन डॉलरमध्ये हा सौदा झाल्याचं 'मेरेडिथ'कडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पत्रकारितेशी निगडीत लिखाण आणि निर्णयांमध्ये बेनीऑफ यांचा हस्तक्षेप नसेल, त्याबाबतचे सर्व निर्णय टाइम्सचे सध्याचे कार्यकारी मंडळच घेईल असंही 'मेरेडिथ'ने स्पष्ट केलं आहे.

याबाबत, पुढील 30 दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. टाईम मॅगझीनचा जगभरात प्रचंड खप आहे. 1923 मध्ये हेन्री लूस यांनी हे मॅगझीन सुरु केले होते. टाईम मॅगझीनला जानेवारी 2018 मध्ये मेरेडिथ ग्रुपने खरेदी केले होते. मात्र, मेरेडिथने हे मॅगझीन सेल्सफोर्सचे सह-संस्थापक मार्क बेनिओफ (53) आणि त्यांची पत्नी लायनी बेनिओफ यांनी विकत घेतली आहे. बेनिओफ यांची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर एवढी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time Magazine Sold For 190 Million To Salesforce Founder Marc Benioff