Nicotine : तंबाकूने अनेक आजार बरे होतात! अमेरिकन लोकांची एक समजूत... युरोपमध्येही नाद... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nicotine

Nicotine : तंबाकूने अनेक आजार बरे होतात! अमेरिकन लोकांची एक समजूत... युरोपमध्येही नाद...

Nicotine and Francisco Fernandes : धूम्रपान आता खूप मोठी समस्या झाली आहे; अनेक लोकं यामुळे कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांने ग्रस्त आहेत. सध्या फॅशन म्हणूनही धूम्रपान करण्यात येते आता तर त्याचे इलेक्ट्रिक पाइप सुद्धा आले आहेत ज्यांचा धूर सुद्धा हवेत दिसत नाही आणि दुसरीकडे धूम्रपान अन् तंबाकू न वापरण्यासाठी लोकांना सल्ले दिले जातात.

पण तुम्हाला माहिती आहे का की आता विष समजली जाणारी तंबाकू एकेकाळी अमेरिकन लोकांसाठी औषध म्हणून रोजच्या वापरात वापरली जाणारी एक गोष्ट होती. आश्चर्य वाटत आहे ना? पण हे खरं आहे.

400BC पासून स्थानिक अमेरिकन लोक या वनस्पतीचा वापर धुम्रपान, तसेच वेदना कमी करणे आणि रोग प्रतिबंधक यासारख्या औषधी गुणधर्मांसाठी करत होते आणि गंमत म्हणजे डॉक्टरांनी त्यांच्या प्रिस्क्रीप्शन मध्ये याचा वापर केलेला होता.

५ मार्च, १५५८ रोजी, स्पॅनिश वैद्य फ्रान्सिस्को फर्नांडिस हे मेक्सिकोहून युरोपमध्ये पहिली जिवंत तंबाखूची रोपे आणि बिया घेऊन परतले. त्यांनी युरोपियन लोकांना तंबाकूची ओळख करुन दिली. टोमॅटो, बटाटे, कोको आणि व्हॅनिला यासह अमेरिकेतील अनेक स्थानिक वनस्पतींपैकी ही एक वनस्पती होती, ज्याची १६ व्या शतकात स्पॅनिशांनी ओळख करुन दिल्याने जग बदलेल.

अशी झाली निकोटीन या नावाची निर्मिती :

१५६० मध्ये, पोर्तुगालमधील फ्रेंच राजदूत जीन निकोट यांनी फ्रेंच राणी कॅथरीन डी मेडिसीला भेट म्हणून काही तंबाखू पाठवली, ज्याने तिच्या सततच्या डोकेदुखीवर बरं वाटले आणि त्याच्या सन्मानार्थ वनस्पतीला "निकोटियाना" असे नाव दिले अन् तंबाकूचा सर्वत्र प्रचार झाला.

ख्रिस्तोफर कोलंबस यांनी फेकून दिलेली तंबाकू :

ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पहिल्यांदा तंबाखूचे धुम्रपान करतांना पाहिले होते, ते परतल्यानंतर त्याला या तंबाकूचा पुरवठा देखील करण्यात आला जो त्यांनी ताबडतोब ओव्हरबोर्डवर फेकून दिला कारण ते अखाद्य होते आणि एक वेगळा वास येत होता.