सुएझ कॅनॉल ब्लॉकमुळे टॉयलेट पेपरची 'पंचाईत'

Ever_Given
Ever_Given

कैरो : इजिप्तच्या सुएझ कालव्यामध्ये अडकलेल्या एव्हर गिव्हन मालवाहू जहाजाने जल वाहतूक मार्गावर ट्रॅफिक जॅम झालं आहे. जगभरातील जवळपास ३०० हून अधिक मालवाहू जहाज आणि तेलाचे कंटेनर अडकून पडले आहेत. या मोठ्या ट्रॅफिक जॅमचा परिणाम आता जाणवू लागले आहेत. 

एव्हर गिव्हन जहाज अडकल्याने जगभरात टॉयलेट पेपरची कमतरता भासू शकते, असा इशारा टॉयलेट पेपर बनविणारी सर्वात मोठी कंपनी सुझानो एसएने दिला आहे. टॉयलेट पेपरची वाहतूक करणारी जहाजे आणि शिपिंग कंटेनरची संख्या घटली आहे. यामुळे कंपनीच्या मालाची वाहतूकही करण्यात उशीर होत आहे. मार्चमध्ये अपेक्षेनुसार निर्यात करू शकणार नाही. त्यामुळे हा माल एप्रिलमध्ये पाठवण्यात येईल, अशी माहिती ब्राझिलियन कंपनी सुझानोचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉल्टर स्चल्का यांनी दिली. 

कार्गो कंटेनर उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केलं आहे. सुएझ कॅनॉलमध्ये एव्हर गिव्हन अडकल्याने संकट आणखी गडद झालं आहे. या जहाजाची लांबी सुमारे ४०० मीटर असून समुद्रातील ट्रॅफिक जॅम हटविण्यासाठी आपत्कालीन दल रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. 

जहाज पूर्ववत करण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न सुरू आहेत. या मार्गावरील वाहतूक कधी पूर्ववत होईल, याबाबत काही सांगता येत नाही. समुद्राच्या लाटा आणि वाऱ्याचा वेग जहाजाला बाहेर काढण्यासाठी अडथळा आणत आहे. तसेच जहाजाच्या आजूबाजूला असलेली वाळू काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सुएझ कॅनॉल प्राधिकरणाचे मुख्याधिकारी ओसामा रबिए यांनी दिली. 

जागतिक व्यापारातील सुएझ कॅनॉलचं महत्त्व
सुएझ कालवा हा जगातील व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतो. सुएझ कालव्यात २३ मार्चला एव्हर गिव्हन नावाचे मालवाहू जहाज अडकल्याने या कालव्यात असंख्य जहाजांची कोंडी झाली आहे. हे जहाज ४०० मीटर लांब म्हणजेच चार फुटबॉल मैदानाच्या आकाराएवढे मोठे जहाज आहे. २० हजार कंटेनर घेऊन जाणाऱ्या जहाजाची उंची दहा मजली इमारतीपेक्षा अधिक आहे. या वाहतूक कोंडीमुळे दरतासाला इजिप्तचे २८०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. कारण इजिप्तला दररोज टोल टॅक्सच्या रूपातून ६७२०० कोटी रुपये मिळतात.

खराब हवामानामुळे हे जहाज फसल्याचे सांगितले जात आहे. लहान जहाजांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. हे जहाज चीनहून नेदरलँडला जात होते. सुएझ कालवा ॲथोरिटीच्या म्हणण्यानुसार, सुएझ कालव्यातील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी सात दिवस लागू शकतात. हे जहाज अडकल्याने जगातील आवश्‍यक वस्तूंच्या किमतीत वाढ होऊ शकते. जगाच्या बारा टक्के व्यापार सुएझ कालव्यातून होतो. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com