टोनी सिंह बनली यंदाची मिस वर्ल्ड

टीम ई-सकाळ
Sunday, 15 December 2019

लंडन : मिस युनिव्हर्सच्या (Miss Universe) घोषणेनंतर शनिवारी रात्री लंडनमध्ये झालेल्या रंगारंग सोहळ्यात 2019च्या मिस वर्ल्डची (Miss World)घोषणा करण्यात आली. जमैकाच्या टोनी एन सिंह हिला यंदाच्या मिस वर्ल्डचा किताब देण्यात आला. फ्रान्सची ओफिनी मेजिनो या स्पर्धेची फर्स्ट रनरअप ठरली तर, भारताची सुमन राव (Suman Rao) हिला तिसऱ्या क्रमांकावर अर्थात सेकंड रनर अप म्हणून समाधान मानावे लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 13 people, people smiling, people standing and wedding

टोनी एन सिंह हिनं 110 देशांच्या तरुणींना मागे टाकत जगत सुंदरीचा किताब मिळवला. त्यात भारताची सुमन राव मागे पडली. सुमन मुळची राजस्थानची रहिवासी आहे. जूनमध्ये तिनं मिस इंडिया किताब जिंकला होता. त्यानंतर तिनं लंडनच्या या स्पर्धेची तयारी केली होती. 

आणखी वाचा - बघा कोण ठरली यंदाची मिस युनिव्हर्स 

दरम्यान, 8 डिसेंबर रोजी अटलांटामध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात 2019च्या मिस युनिव्हर्सची घोषणा झाली होती. त्यात दक्षिण अफ्रिकेच्या झोझिबिनी टुन्झी (Miss Universe 2019 Winner Zozibini Tunzi South Africa) हिनं मिस युनिव्हर्सचा किताब मिळवला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: toni-ann singh from jamaica is now miss world 2019