टोरांटो व्हॅन हल्ला : 10 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

''यातील साक्षीदारांनी पुढे यावे आणि पोलिसांना चौकशीसाठी मदत करावी.''

-  टोरंटोचे पोलिस उपप्रमुख पीटर युएन

वॉशिंग्टन : टोरांटो येथील एका चारचाकी वाहनाने पदपथावरील पादचाऱ्यांचा उडविले. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, इतर 15 जण जखमी झाले आहेत. ही घटना काल (सोमवार) दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी अलेक मिनास्सियन या 25 वर्षीय संशयितास कॅनेडियन पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी अलेक मिनास्सियन याची चौकशी सुरु केली आहे. हे कृत्य नेमके का केले, यामागचा त्याचा हेतू काय होता, हे अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूड्यू यांनी सांगितले, की हा हल्ला अत्यंत दुर्देवी आणि मूर्खपणाचा आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांचे आम्ही सांत्वन करतो. या घटनेनंतर लगेचच त्या संशयित हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली. 

toronto car attack

दरम्यान, पोलिसांनी त्या संशयित हल्लेखोरास त्याच्याकडील बंदूक खाली टाकण्यास सांगितले. त्यानंतर झालेल्या झटापटीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्या संशयितास कोणत्याही गोळीबाराविना अटक केली आली. त्याचे वाहन दोन किमीपर्यंत भरधाव वेगात जात होते. याप्रकरणी सबंधित वाहनचालकाला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 
 
याबाबत टोरंटोचे पोलिस उपप्रमुख पीटर युएन यांनी यातील साक्षीदारांनी पुढे यावे आणि पोलिसांना चौकशीसाठी मदत करावी, असे आवाहन केले. 

Web Title: Toronto van attack Suspect quizzed after 10 pedestrians killed 15 Injury