टोरँटो ; हल्ल्यापूर्वी व्हॅनचालकाची फेसबुकवर कॉमेंट

पीटीआय
गुरुवार, 26 एप्रिल 2018

टोरँटो : टोरॅंटोच्या योंगे स्ट्रीटवर भरधाव व्हॅन चालवून दहा जणांना चिरडणारा चालक अलेक मिनसिआन याने हल्ला करण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर फेसबुकवर गोपनीय कॉमेंट पाठवल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. सोमवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात दहा नागरिक मृत्युमुखी पडले होते. 

अलेकने फेसबुकवर केलेली पोस्ट खळबळजनक आहे. त्याने 22 वर्षांचा अमेरिकी गुन्हेगार इलियट रॉजरचे कौतुक केले आहे. या इलियटने 2014 मध्ये कॅलिफोर्नियात सहा जणांची हत्या केली होती आणि त्यानंतर स्वत:लाही संपविले होते. यादरम्यान मिनसिआनच्या खुलाशातून आणखी एक बाब समोर येते, ती म्हणजे महिलांविषयी द्वेष. इलियट आणि अलेक यांच्यात अनेक बाबतीत साधर्म्य आढळून येत आहे; मात्र, पोलिस केवळ संशयाच्या पातळीवरच चौकशी करत आहेत.

अलेकदेखील महिलांचा द्वेष करत असावा, असा पोलिसांचा कयास आहे. मंगळवारी आरोपी चालकाला न्यायालयात हजर करण्यात आले होते. मिनसिआनला केलेल्या कृत्याचा कोणताही पश्‍चात्ताप वाटत नव्हता. तो निर्विकार चेहऱ्याने उभा होता. आरोपीला दहा मे रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. यात महापौरांचादेखील समावेश होता.

Web Title: Torranto Attack Van Driver Comment before attack