
आता प्रशिक्षित श्वान एअरपोर्टवर शोधणार कोविड रुग्ण
संपूर्ण जगात कोरोना महामारीने (Corona Pandemic) सर्वांनाच हैराण केले आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणांवर कोरोनाची लागण झालेल्यांची ओळख पटवणे जिकरीचे होऊन बसते. परंतु, यावर आता काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण प्रशिक्षित श्वान (Sniffer Dogs) विमानतळावरील प्रवाशांमधील कोरोना लागण झालेली व्यक्तीचा शोध घेऊ शकते, एका संशोधन अहवालात हा दावा करण्यात आला आहे. बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये हा दावा करण्यात आला आहे. (Trained Sniffer Dogs Detect Covid Infected People At Airport)
हेही वाचा: ताजमहालच्या 'त्या' 22 खोल्यांमध्ये काय? ASI ने प्रसिद्ध केले फोटो
बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित अहवालात असे म्हटले आहे की, प्रशिक्षित श्वान SARS-CoV-2 ची लागण झालेल्या हवाई प्रवाशांना अचूकपणे शोधू शकते. तसेच, कोविड संक्रमित व्यक्तीला शोधण्याची ही पद्धत महत्त्वाची असून, यामध्ये संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील रूग्ण शोधण्यासोबत साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय हे प्रशिक्षित श्वास कोरोनाचे अल्फा व्हेरिएंट अचूकपणे शोधण्यात कमी यशस्वी झाल्याचा महत्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या श्वानांना केवळ कोरोनाचा मूळ विषाणू शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. परंतु, यावरून हे श्वान वेगवेगळ्या गंधामध्ये फरक करण्यास किती सक्षम आहेत हे सिद्ध होते.
हेही वाचा: तोपर्यंत ट्वीटर खरेदी पुढे जाणार नाही; मस्क मागणीवर ठाम
चार श्वानांना प्रशिक्षण
फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापीठ आणि हेलसिंकी विद्यापीठाच्या संशोधकांनी 2020 मध्ये चार श्नानांना SARS-CoV-2 चा शोध घेण्यासाठी प्रशिक्षित केले होते. यापैकी प्रत्येक श्वानाला यापूर्वी औषधे किंवा धोकादायक वस्तू किंवा कर्करोग शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या श्वानांना प्रशिक्षण देण्यासाठी, 420 स्वयंसेवकांनी प्रत्येक श्वानाला त्यांच्या स्वतःच्या कातडीचे नमुने दिले होते. त्यानंतर या श्वनांनी प्रत्येक 114 स्वयंसेवकांच्या त्वचेच्या नमुन्यांचा वास घेतला आणि पीसीआर स्वॅब चाचण्यांमध्ये Sors-CoV-2 पॉझिटिव्ह आढळले, तर 306 निगेटिव्ह आढळले.
कोरोना चाचणीसाठी, सात चाचणी सत्रांमध्ये प्रत्येक श्वानासाठी वेगवेगळे नमुने स्निफिंग करण्यात आले होते. एवढेच नाही तर, या श्वानांनी केलेल्या कोरोना चाचणीच्या पॉझिटिव्ह केसची अचूकता 92 टक्के, तर निगेटिव्ह केसची अचूकता 91 टक्के होती. सप्टेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान फिनलंडच्या हेलसिंकी-व्हेंटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या 303 प्रवाशांच्या तपासणीसाठी हे चार श्वान तैनात करण्यात आले होते. तसेच प्रत्येक प्रवाशाची पीसीआर स्वॅब चाचणीदेखील करण्यात आली आणि स्निफर डॉगच्या चाचणी निकालांशी तुलना करण्यात आली. यात 296 स्निफरचे निकाल एकसारखेच असल्याचे समोर आले होते.
Web Title: Trained Sniffer Dogs May Accurately Detect Covid Infected Airport Passengers Study
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..