गुहेतून बाहेर येण्यासाठी 'त्या' मुलांना खास प्रशिक्षण

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

जावा (थायलंड) : गुहेत अडकलेल्या १12 मुलांना आणि त्यांचे 25 वर्षीय प्रशिक्षक यांना अद्याप बाहेर काढण्यात यश आलेले नाही. बचावपथके या मुलांपर्यंत पोहोचली असली तरी या मुलांना गुहेबाहेर काढणे सोपे नसल्याचे थायलंड सरकारने म्हटले आहे. गुहेमध्ये पाणी भरलेले असल्यामुळे या मुलांना बाहेर काढण्याची प्रक्रिया खूप कठिण आहे. सुरक्षित बाहेर येण्यासाठी या मुलांनाही बचाव पथकांना तितकेच सहकार्य करावे लागणार असून, काही गोष्टी शिकून घ्याव्या लागणार आहेत. बचाव मोहिमेचा भाग म्हणून आता या मुलांना पोहोण्याचे आणि पाण्यात डुबकी मारण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. 

अकरा दिवसांपासून ही मुले गुहेत अडकली आहेत. या मुलांपर्यंत सर्व वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली असून, त्यांना अन्नाचाही पुरवठा केला जात आहे.या मुलांना मानसिक बळ देण्यासाठी पाणबुडे, नेव्ही सीलचे पथक आणि समुपदेशकही त्यांच्यासोबत आहेत. 

थायलंडच्या नेव्ही सीलच्या पथकाने या बचाव मोहिमेच्या कामाचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. सध्या गुहेमधून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पाण्याची पातळी कमी झाली आणि प्रवाहाची गती मंदावली तर या मुलांना लगेच बाहेर काढता येऊ शकते.

या संपूर्ण संघाला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत घेण्यात येत आहे. थायलंडच्या नेव्ही सीलच्या पथकाबरोबर अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमधील तज्ञही या मुलांना बाहेर काढण्यासाठी मेहनत घेत होते.या मुलांना गुहेबाहेर काढण्याचे दोन पर्याय बचाव पथकाकडे आहेत. गुहेत साचलेल्या पाण्यातून पोहून ही लहान मुलं गुहेतून बाहेर येऊ शकतात किंवा गुहा वरून खोदून त्यानंतर या मुलांना बाहेर काढले जाऊ शकते मात्र दोन्ही पर्यायापैकी एका पर्यायाचा विचार केला तरी या मुलांना आणखी काही दिवस इथे राहावे लागणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: training to that football players for come out from caves in Thailand

टॅग्स