सार्वजनिक 'पारदर्शक' शौचालयाचा वाढता वापर...

वृत्तसंस्था
Thursday, 20 August 2020

जपानने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी पारदर्शक शौचालय उभारले आहेत. पारदर्श शौचालय असल्यामुळे आतमधील स्पष्टपणे दिसते. तरी पण या शौचालयचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पारदर्शक शौचालय योजना यशस्वी झाली आहे.

टोकियो: जपानने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी पारदर्शक शौचालय उभारले आहेत. पारदर्श शौचालय असल्यामुळे आतमधील स्पष्टपणे दिसते. तरी पण या शौचालयचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पारदर्शक शौचालय योजना यशस्वी झाली आहे.

...म्हणून गाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सार्वजनिक शौचालय म्हटले की घाणीचे साम्राज्य. त्यामुळे अनेकजण बाहेर असताना सार्वजनिक शौचालयामध्ये जाणे टाळतात. नैसर्गिक क्रिया दाबून ठेवल्यामुळे शरिरावर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय, महिलांचीही कुंचबना होते. यामळे जपान सरकारने पारदर्शक आणि स्वच्छ असे शौचालय बनविण्याची योजना आखली होती. अखेर, टोकियोमध्ये सार्वजनिक ठिकाणी पारदर्शक शौचालय बसवले. काही दिवसांमध्ये या शौचलयाचा वापर वाढू लागला आहे.

Image may contain: outdoor

प्रित्जकर पुरस्कार विजेते वास्तुविशारद शिगेरू बान यांनी हे पारदर्शक शौचालय तयार केले आहे. यासाठी 'स्मार्ट ग्लास'चा वापर करण्यात आला आहे. टोकियोमध्ये 5 ठिकाणी असे पारदर्शक शौचालय बसवण्यात आले आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी असे करण्यात आले आहे. टोकियो मधील येयोयोगी फुकामाची मिनी पार्क आणि हरू-नो-ओगावा कम्युनिटी पार्क येथे हे पारदर्शक शौचालय उभारले गेले आहेत. पण, शौचालय पारदर्शक असले तरी एकदा वापर करणारा आत गेल्यानंतर कडी लावली की आपोआप काचेवर पडदे ओढले जातात आणि अपारदर्शक होते. ही खरी पारदर्शक शौचालयाची किमया आहे. त्यामुळे नागरिकांचे स्वातंत्र्य देखील अबाधित राहते आणि स्वच्छतेबाबत जागरूकता वाढते.

शवगृहात ठेवलेला मृतदेह उठून बसला अन् लागला पळू...

Image may contain: one or more people and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transparent toilet at japan public place park