तोंडी तलाक ही 'अविवादित' रीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

प्रेषित महंमद यांच्या काळापासून ही पद्धत अस्तित्वात असल्याचे सांगत ही सूचना नाकारण्यात आली आहे.

कैरो  : अध्यक्ष अब्देल-फत्तह इल-सिसी यांनी तोंडी तलाकवर बंदीसाठी कायदे करण्याची केलेली सूचना इजिप्तच्या प्रमुख इस्लामिक समितीने नाकारली आहे.

प्रेषित महंमद यांच्या काळापासून ही पद्धत अस्तित्वात असल्याचे सांगत ही सूचना नाकारण्यात आली आहे. सुन्नी इस्लाममधील सर्वोच्च अधिकार असलेल्या अल-अझहरमधील वरिष्ठ धर्मप्रसारकांच्या समितीने काल एकमताने ही रीत अविवादित असल्याचे सांगितले.

Web Title: triple talaq is undisputed tradition