ट्रम्पचे जावई अमेरिकेचे वरिष्ठ सल्लागार

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

जेर्ड कुश्नेर हे प्रॉपर्टी डेव्हलपर, आणि पब्लिशर आहेत. कुश्नेर हे अमेरिकेच्या अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेत कुश्नेर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कुश्नेर यांच्याकडे कोणताही राजकीय अनुभव नसताना त्यांना हे पद दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

न्यूयॉर्क - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जावई जेर्ड कुश्नेर यांची अमेरिकेच्या अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ट्रम्प 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

जेर्ड कुश्नेर हे प्रॉपर्टी डेव्हलपर, आणि पब्लिशर आहेत. कुश्नेर हे अमेरिकेच्या अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेत कुश्नेर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कुश्नेर यांच्याकडे कोणताही राजकीय अनुभव नसताना त्यांना हे पद दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे ट्रम्प हे जावई कुश्नेर यांच्यासोबत मिळून परराष्ट्र धोरणे अवलंबिताना दिसतील.

आज (मंगळवार) कुश्नेर यांचा वाढदिवस असून, सासऱ्याकडून त्यांना मिळालेली ही अनमोल भेट असल्याचे बोलले जात आहे. ट्रम्प प्रशासनात कुश्नेर हे सर्वात कमी वयाचे आहेत. जेर्ड यांची भूमिका महत्त्वाची असणार असून, निवडणूक प्रचारादरम्यान ते माझे विश्वसनीय सल्लागार होते. त्यामुळे मला गर्व आहे, की ते आमच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

फोर्ब्स मासिकाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, कुश्नेर यांच्या कुटुंबियांजवळ तब्बल 1.8 अब्ज अमेरिकी डॉलरची संपत्ती आहे. ते ट्रम्प प्रशासनात सहभागी झाले तरी वेतन घेणार नाहीत. जेश्नर हे व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ रायनस प्रीबस आणि स्टीव्ह बॅनन यांच्यासोबत काम करताना दिसतील.

Web Title: Trump’s son-in-law Jared Kushner to be senior White House adviser