अमेरिकेने उत्तर कोरियासोबतची चर्चा केली रद्द; व्हिसा रद्द

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन- उत्तर कोरियाचे प्रतिनिधी मंडळ आणि अमेरिकेतील माजी अधिकाऱ्यांच्या पथकादरम्यान होणारी नियोजित अनौपचारिक चर्चा रद्द करण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाने उत्तर कोरियन प्रतिनिधींच्या व्हिसांची प्राथमिक मान्यताही रद्द केली आहे. 

उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयातील अमेरिकन संबंध वार्ता विभागाचे संचालक खो सोन-हुई यांच्या नेतृत्वाखाली सहा प्रतिनिधींचे पथक आणि अमेरिकन तज्ज्ञ यांच्यामध्ये पुढील आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. 

अमेरिकन परराष्ट्र धोरणाच्या राष्ट्रीय समितीचे प्रमुख डोनाल्ड झगोरिया यापूर्वी पाठविलेल्या ईमेलमध्ये नियोजनानुसार चर्चा होणार असल्याचे सांगितले होते. 
एक मध्यस्थी गटाच्या वतीने ही चर्चा आयोजित करण्यात येणार होती. मात्र, आता व्हिसा मंजूर करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे चर्चा रद्द झाल्याचे डोनाल्ड यांनी सांगितले आहे. 
 
Web Title: trump administration cancels talks with north korea