अमेरिकेकडून इराणवर निर्बंध 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रमाला तंत्रज्ञान आणि साहित्याचा पुरवठा करणाऱ्या इराणी कंपन्यांवर निर्बंध घातले. आखाती देशांमध्ये अशांतता पसरविण्याचा इराणचा हेतू असल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे.

वॉशिंग्टन - इराणने क्षेपणास्त्र चाचणी घेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाचा भंग केल्याचा आरोप करत अमेरिकेने इराणच्या बाराहून अधिक कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

अमेरिकेचे आरोप आधारहिन असल्याचे इराणने म्हटले होते. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच इराणने क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. ट्रम्प प्रशासनाने त्यांच्यावर राष्ट्रसंघाच्या ठरावाचा भंग केल्याचा आरोप केला, तसेच त्यांच्यावर विशेष लक्ष असल्याचे जाहीर केले होते.

आज पुढील कारवाई करत अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रमाला तंत्रज्ञान आणि साहित्याचा पुरवठा करणाऱ्या इराणी कंपन्यांवर निर्बंध घातले. आखाती देशांमध्ये अशांतता पसरविण्याचा इराणचा हेतू असल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे.

Web Title: Trump administration tightens Iran sanctions