सिंगापुरात होणार ट्रम्प आणि जोंग यांची भेट

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

वॉशिंगटन : सिंगापुर येथे 12 जूनला शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरीयाचे प्रमुख किम जोंग उन यांची भेट होऊन सकारात्म चर्चा होण्याचे सुतोवाच मिळाले आहेत. या परिषदेच्या दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट होऊन आण्विक निशस्त्रीकरणावर चर्चा होणार आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अमेरिकेतील दूत किम योंग चोल यांच्यात 80 मिनीटे चर्चा झाली. यानंतर या दोन्ही नेत्यांच्या भेटीची घोषणा करण्यात आली. या संदर्भातील किम जोंग यांचे एक पत्र ट्रम्प यांना दिले.   

या भेटीविषयी ट्रम्प म्हणाले, "आजच्या बैठकीतील चर्चा खुपच चांगगली झाली. सिंगापुर येथे 12 जूनला होणाऱ्या शिखर परिषदेत आम्ही असणार आहोत. या संधीमुळे त्यांना जाणून, समजून घेता येईल. कोरियन द्वीपकल्पावरील आण्विक निशस्त्रीकरणाची प्रक्रिया मोठी आहे. ही एका बैठकीत पुर्ण होणार नाही परंतु, यामुळे दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध निर्माण होत आहेत." ही बैठक चांगली झाल्याचे ट्रम्प यांनी ट्विटही कले आहे.  

प्रत्येकाला अमेरिका व्हायचे आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, प्रत्येकाला अमेरिकेसारखे बनायचे आहे. उत्तर कोरियाच्या लोकांनाही हेच वाटत आहे. त्यांना आपला विकासही करायचा आहे. यासाठी अमेरिका त्यांची मदत करण्यास उत्सुक आहे. कारण आमच्याशिवाय ते अमेरिकेसारखे होऊ शकणार नाहीत.

Web Title: trump and jong meet in singapore