सहकाऱ्यांच्या निवडीसाठी ट्रम्प यांचा गट सज्ज

यूएनआय
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

निष्ठावंत आणि स्वत:च्या मुलांचा गटात समावेश; धोरणेही बदलणार
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी 2017 ला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत; मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळासाठी योग्य व्यक्ती शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. या व्यक्ती निवडण्यासाठी ट्रम्प यांनी निष्ठावंतांचा एक गट तयार केला असून, या गटात त्यांच्या तीन मुलांचाही समावेश आहे.

अमेरिकेचे नियोजित उपाध्यक्ष माइक पेन्स हे या गटाचे प्रमुख आहेत. ट्रम्प यांची कन्या इव्हाका आणि मुलगे एरिक आणि डोनाल्ड ज्युनियर हे त्यांना मदत करतील. एकूण 16 जणांच्या या गटात ट्रम्प यांचे जावई जेरेड कुश्‍नर यांचाही समावेश आहे. प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्याविरोधात त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे नेते गेले असताना ज्या मोजक्‍या नेत्यांनी त्यांची पाठराखण केली आणि योग्य सल्ले दिले, त्यांच्यावरच ट्रम्प यांनी विश्‍वास दाखविला आहे. अमेरिका सरकारच्या कोणत्या धोरणात कसा बदल करायचा, मंत्रिमंडळात कोण असणार आणि इतर चार हजार पदांवर कोणाची नियुक्ती करायची, याबाबतचा निर्णय हा गट घेणार आहे.

उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी सूत्रे हाती घेतल्यावर उद्योगांवरील कोणती निर्बंधे मागे घेतली जातील, याबाबतही जोरात काम सुरू आहे. कर कमी करणे, स्थलांतरिंचा ओघ कमी करणे आणि ओबामा यांच्या आरोग्य योजना बंद करणे, अशी आश्‍वासने ट्रम्प यांनी दिली होती. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने ट्रम्प यांनी आतापासूनच प्रयत्न करण्यास सुरवात केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाविरोधात अमेरिकेत सुरू झालेली निदर्शने आज तिसऱ्या दिवशीही सुरू होती. नागरिकांनी मिआमी, अटलांटा, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को येथे जोरदार आंदोलन करत ट्रम्प यांना विरोध केला. अनेक ठिकाणी आंदोलकांनी महामार्गावरील वाहतूक बंद पाडली. या तीन दिवसांत पोलिसांनी दोनशेहून अधिक निदर्शकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आतापर्यंत आंदोलकांवर टीका करणाऱ्या ट्रम्प यांनी आज आपली भूमिका बदलत त्यांच्या ठामपणाचे कौतुक केले. "आपल्या देशाचे भले व्हावी, अशी इच्छा असणारे काही नागरिक आंदोलन करत आहेत. त्यांच्या या ठामपणाचा मला आदर आहे. आपण सर्व जण एकत्र येऊ,' असे ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Web Title: Trump group of colleagues in the choice of ready