ट्रम्प यांनी मौन सोडले; भारतीय अभियंत्याच्या हत्येचा केला निषेध

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

वॉशिंग्टन: कान्सासमध्ये वर्णद्वेशातून झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येप्रकरणी चौफेर टीका झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अखेर मौन सोडले. धोरणांबाबत कदाचीत आपल्यात मतभेद असतील; मात्र वाईट प्रवृत्तीच्या आणि द्वेश वाढविणाऱ्या शक्तींच्या विरोधात संपूर्ण अमेरिका एकत्रितपणे उभी राहील, असे ट्रम्प म्हणाले. ज्यू समुदायावरील हल्ले आणि कान्सासमधील भारतीय अभियंत्याच्या हत्येचाही ट्रम्प यांनी या वेळी निषेध केला.

मागील बुधवारी कान्सासमधील हॉटेलमध्ये भारतीय अभियंता श्रीनिवास कुचीभोतलाची वर्णद्वेशातून एका अमेरिकी नागरिकाने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात श्रीनिवासचा भारतीय मित्र आणि एक अमेरिकी नागरिकही जखमी झाला होता. ट्रम्प यांच्या काळात वर्णद्वेशातून होत असलेल्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप होत आहे. ज्यू समुदायाच्या धार्मिक स्थळांवरही अमेरिकेत हल्ले झाले आहेत. या सर्व घटनांबद्दल ट्रम्प यांनी सोईस्करपणे मौन पाळले होते. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्थरांतून टीका होत होती.

या पार्श्वभूमीवर अमेरिकी कॉंग्रेसच्या संयुक्त सभेत पहिल्यांदाच भाषण करताना ट्रम्प यांनी ज्यू वरील हल्ले आणि कुचीभोतलाची हत्या आदींबद्दल दुःख व्यक्त करत या घटनांचा निषेध केला. या पूर्वी व्हाइट हाउसनेही कुचीभोतलाची हत्या दुर्दैवी असल्याचे म्हटले होते.

Web Title: Trump left the silence; The murder of Indian engineers protest