अध्यक्षपदासाठी ट्रम्प कायमच अयोग्य - बराक ओबामा

पीटीआय
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

ओरलॅंडो - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज पुन्हा एकदा तिखट शब्दांत टीका केली.

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ट्रम्प हे कायमच अयोग्य व्यक्ती आहेत. तसेच, अमेरिकेच्या सेनादलांचे प्रमुख पद सांभाळण्यासाठी आवश्‍यक मानसिकतेचा ट्रम्प यांच्याकडे अभाव आहे. वादग्रस्त ट्रम्प यांच्या उमेदवारीबाबत त्यांच्याच रिपब्लिकन पक्षात उभी फूट पडली आहे, ही बाब अमेरिकेतील मतदारांनी ध्यानात घ्यावी, असा हल्लाबोल ओबामा यांनी आज प्रचारसभेत केला.

ओहिओतील कोलंबस येथील प्रचारसभेत ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. या वेळी ओबामा म्हणाले, की ट्रम्प यांना पाठिंबा देण्याच्या मुद्‌द्‌यावर त्यांच्याच रिपब्लिकन पक्षात मोठे मतभेद आहेत. ट्रम्प यांच्यासारख्याला पाठिंबा देणे चुकीचे असल्याचे मत अनेक रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी उघडपणे मांडले आहे. यातून अमेरिकी जनतेने योग्य तो बोध घ्यावा.

आपल्या संपूर्ण आयुष्यात श्रीमंतांव्यतिरिक्त इतर कोणालाही भेटण्यास वेळ नसलेल्या व्यक्तीला तुम्ही पाठिंबा देणार काय? असा प्रश्न ओबामा यांनी उपस्थित केला. महिलांबद्दल ट्रम्प यांची मते काय आहेत, हे सर्व अमेरिकाला ज्ञात झाले आहे. अशी व्यक्ती जगभरात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार काय? असा प्रश्नही ओबामांनी उपस्थितांना विचारला.

Web Title: Trump for president are always wrong