ट्रम्प यांनी केली 2 प्रमुख अधिकाऱ्यांची हकालपट्टी

पीटीआय
मंगळवार, 31 जानेवारी 2017

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रभारी अॅटर्नी जनरल सॅली येट्स यांचीही हकालपट्टी केली. ट्रम्प यांच्या स्थलांतर आणि निर्वासितांबाबतच्या निर्णयाचा न्यायालयात बचाव करण्यास येट्स यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर ट्रम्प यांनी ही कारवाई केली आहे. 

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे (ICE) संचालक डॅनियल रॅग्सडेल यांची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हकालपट्टी केली आहे. 
त्या पदावर अध्यक्ष ट्रम्प यांनी थॉमस डी. होमन यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या देशांतर्गत सुरक्षा विभागाचे निवृत्त महासचिव जॉन केली यांनी दिली. 

स्थलांतर बंदीविषयीच्या आदेशावरून  वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित संचालक रॅग्सडेल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. 
तत्पूर्वी, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रभारी अॅटर्नी जनरल सॅली येट्स यांचीही हकालपट्टी केली. ट्रम्प यांच्या स्थलांतर आणि निर्वासितांबाबतच्या निर्णयाचा न्यायालयात बचाव करण्यास येट्स यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर ट्रम्प यांनी ही कारवाई केली आहे. 

"मला विश्वास आहे की ते 'ICE'च्या लोकांचे सक्षम व प्रभावी प्रतिनिधी म्हणून सेवा करतील. अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताशी सुसंगत स्थलांतर कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करेन," असे जॉन केली यांनी सांगितले. 

दरम्यान, केली यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात रॅग्सडेल यांच्या हकालपट्टीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे रॅग्सडेल यांच्या नोकरीवर सोमवारी गंडांतर आले. 
 

Web Title: Trump replaces acting Immigration Enforcement head