ट्रम्प यांचा मोठा निर्णय; चीनची 'सलगी' करणाऱ्या WHO पासून अमेरिकेचे 'विलगिकरण'

who, trump, america
who, trump, america

वाशिंग्टन : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. वेगाने संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यात  WHO अपयशी ठरल्याचे सांगत या जागतिक संघटनेशी अमेरिकेचे असणारे संबंध तोडत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  यापूर्वी ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्राच्या या संस्थेचा निधी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. जागतिक आरोग्य संघटना चीनचं 'बाहुलं' बनली आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाला चीनसोबतच जागतिक आरोग्य संघटनेची अयोग्य भूमिका कारणीभूत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.  

जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले संबंध तोडण्याच्या निर्णयावर ट्रम्प म्हणाले की, सूचनेनुसार आवश्यक त्या तरतूदी करण्यातच संस्था पूर्णत: अपयशी ठरली आहे. त्यामुळे आम्ही या संस्थेंशी असणारे संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेला जो निधी अमेरिकेकडून दिला जात होता त्याचा वापर जागतिक आरोग्यसंबंधीत घटकासाठी केला जाईल, अशी माहिती देखील ट्रम्प यांनी यावेळी दिली.   

'लॉकडाउन-5' चा निर्णय कोणाच्या कोर्टात?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन-अमेरिका यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. या जिवघेण्या विषाणूसंदर्भातील माहिती लपवून चीनने जगाला संकटात टाकले आहे, असा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनाही महा साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यात असमर्थ असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. एवढेच नाही तर जागतिक आरोग्य संघटना चीनच्या इशाऱ्यावर काम करते, असा आरोपही अमेरिकेकडून करण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या बजेटमध्ये अमेरिकेचा वाटा हा सर्वाधिक होता. मागील वर्षी अमेरिकेने  (WHO) ला निधी स्वरुपात जवळपास 400 मिलियन डॉलर इतकी रक्कम दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com