राजकीय 'डेट'साठी लॉगइन करा trumpsingles वर

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

कॅलिफोर्निया - 'डेट' म्हटल की कॅंडललाईट डिनर, रोमॅन्टिक गप्पा असंच काहीस आपल्याला अपेक्षीत असंत. परंतु, एखाद्या 'डेट'वर तुमचा पार्टनर जागतिक राजकारणाच्या विषयावरच बोलत बसला तर..? ही काय 'डेट' असंच वाटेल ना...? पण, अशा विषयात रस अणाऱ्या व्यक्तिंसाठी देखील आता 'डेटिंग' वेबसाईट आहे. डेव्हिड गॉस नावाच्या एका व्यक्तिने trumpsingles.com नावाचे संकेतस्थळ तयार केले आहे. यावरुन 'डेट'साठी सिलेक्ट केलेल्या पार्टनर सोबत तुम्ही राजकारणाबद्दल अगदी मोकळेपणाने बोलू शकता. सध्या हे संकेस्थळ अमेरिकेतील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. यामध्ये ट्रम्प आणि हिलरी यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच चूरस निर्माण झाली होती. याचाच फायदा घेउन अशा प्रकारचे संकेतस्थळ तयार करण्याचे गॉस यांच्या डोक्यात आले. यामुळे तुमचा पार्टनर विरोधी पक्षाचा समर्थक असेल तर त्याच्याबरोबर डेटवर जायचे की नाही हे ठरविण्याची सोय यामध्ये देण्यात आली. 

डेव्हिड स्वत: ट्रम्प समर्थक असल्याने त्यांनी या संकेतस्थळाचे नाव trumpsingles असे ठेवले. ट्रम्प यांच्या खास सिंगल असणाऱ्या समर्थकांसाठी हे संकेतस्थळ आपण सुरु केल्याचे गॉस यांनी सांगितले.

हे संकेतस्थळ तसे नवीन नाही. 6 जून 2016 मध्येच त्याची सुरुवात झाली. परंतु, ट्रम्प यांच्या विजयानंतर या संकेस्थळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. या संकेतस्थळाच्या निमित्ताने ट्रम्प यांचे जास्तित जास्त समर्थक एकत्र येत असल्याचे गॉस यांनी म्हटले आहे. 

व्हिडिओ सौजन्य - FOX 4 Now youtube

Web Title: Trump Singles – A Dating Site Catering Exclusively to Trump Supporters

व्हिडीओ गॅलरी