ट्रम्प यांचा मोदींना धक्का; ऍपल सारख्या कंपन्यांना उघड धमकी

Trump to tax companies manufacturing outside US Apples India plan may be hit
Trump to tax companies manufacturing outside US Apples India plan may be hit

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांसाठी भारतात पायघड्या घालण्याची योजना मोदी सरकारने आखली आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र भारतात जाऊ इच्छिणाऱ्या ऍपल सारख्या कंपन्यांना उघड धमकी दिली आहे.

ऍपल कंपनी त्यांचं उत्पादन चीनमधून भारतात हलवण्याच्या विचारात आहे, याबाबत ट्रम्प यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मागच्या भाषणात भारताला जागतिक पुरवठादार देश करण्याची संधी असल्याचं सांगितलं. चीनमधून उद्योग भारतात यावेत, म्हणून कामगार कायद्यांमध्येही बदल करण्यात येत आहेत. तसेच उद्योगांसाठी जमिनही कमी किंमतीत देण्यात येत आहे. एकूणच चीनमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या अमेरिकन कंपन्या जर पुन्हा अमेरिकेत आल्या नाहीत, तर त्यांच्यावर नवीन टॅक्स लावण्यात येईल, असं ट्रम्प म्हणाले आहेत.
------
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत काशी विश्वनाथ मंदिराचा मोठा निर्णय
------
पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणारे आचार्य तुषार भोसले आहेत तरी कोण?
-----
लॉकडॉऊन 4:0 च्या गाईडलाईन जाहीर; काय चालू, काय बंद?
-------
धक्कादायक ! ज्येष्ठ साहित्यिकाचे कोरोनामुळे निधन
-------
अमेरिकेत परतणाऱ्या कंपन्यांना टॅक्समध्ये सूट देण्यापेक्षा आम्ही अमेरिकेत पुन्हा न येणाऱ्या कंपन्यांना नवा टॅक्स लावू, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकन कंपन्यांनी पुन्हा एकदा त्यांचं उत्पादन अमेरिकेत सुरू करावं, त्यामुळे अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या मिळतील, यासाठी ट्रम्प यांनी अनेकवेळा प्रयत्न केले. ट्रम्प यांनी मागच्या निवडणुकीत स्थानिकांचा रोजगार हा मुद्दा केला होता. तसंच मेक अमेरिका ग्रेट अगेन हा नाराही त्यांनी मागच्या निवडणुकीत दिला होता. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने बाहेरून उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या सुविधा आणि सूट देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठीही राज्य सरकारने रेड कार्पेट टाकलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com