ट्रम्प यांना भेटण्यास उत्सुक - दलाई लामा

पीटीआय
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

उलानबातार (मंगोलिया) - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आपण भेट घेणार असल्याची माहिती आज तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी दिली. नोबेल पारितोषिक विजेत्या दलाई लामा यांच्या या घोषणेनंतर चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सध्या मंगोलियाच्या दौऱ्यावर असलेल्या लामा यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की अमेरिका हा जगातील मुक्त देशांपैकी एक आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांची मी अमेरिकेत जाऊन भेट घेणार आहे. दलाई लामा यांच्या मंगोलिया दौऱ्यालाही चीनकडून विरोध दर्शविण्यात आला होता.

दलाई लामा यांच्या विधानावर चीनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत जगभरातील मोठ्या नेत्यांचे चीनशी असलेले संबंध खराब करण्याचा प्रयत्न लामा हे करत आहेत. त्यामुळे जगभरातील नेत्यांनी याबाबत काळजी घ्यावी, असा सल्लाही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

Web Title: Trump was eager to meet dalai lama