7 मुस्लिम देशातील शरणार्थींना प्रवेशबंदी- ट्रम्प

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

इराक, सिरिया, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या सात देशांतील सुमारे 134 मिलियन नागरिकांना अमेरिका प्रवेशबंदी असणार आहे.

वॉशिंग्टन - निवडणूकीपूर्वी मुस्लिम नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याची घोषणा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता या आश्वासनाबाबत अंमलबजावणी करण्यास सुरवात केली असून, त्यांनी मुस्लिम बहुल सात देशांतील शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्यास नकार दिला आहे.

ट्रम्प यांनी शुक्रवारी या अध्यादेशावर स्वाक्षरी करत निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेकडे वाटचाल केली आहे. त्यांनी यापूर्वी स्थलांतरीत नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत. आता ट्रम्प यांनी कट्टरतावादी मुस्लिम राष्ट्रांतील शरणार्थींना अमेरिकेत प्रवेशबंदी केली आहे. सध्या ही बंदी तात्पुरत्या स्वरुपात असणार आहे.

व्हाईट हाऊसने दिलेल्या निवेदनानुसार, मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असलेल्या सात राष्ट्रांतील शरणार्थींना पुढील 90 दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या यादीत भविष्यातही काही देश समाविष्ट होतील. सध्या इराक, सिरिया, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या सात देशांतील सुमारे 134 मिलियन शरणार्थींना अमेरिका प्रवेशबंदी असणार आहे. आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नाही. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.

सिरियातील मुस्लिम नागरिकांच्या तुलनेत ख्रिश्चन शरणार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी सिरियातील 10 हजार शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश दिला होता. तर, कॅनडाने 35 हजार शरणार्थींना प्रवेश दिला होता.

Web Title: Trump's latest executive order: Banning people from 7 countries