इंडोनेशियात त्सुनामीचा कहर; 43 जणांचा मृत्यू

रविवार, 23 डिसेंबर 2018

जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्यामध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला शनिवारी रात्री बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्यात 43 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. 

जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्यामध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला शनिवारी रात्री बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्यात 43 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. 

त्सुनामीमुळे येथील सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याने वित्तहानी आणि जीवितहानीचा नेमका अंदाज येण्यासाठी आणखी काही वेळ जावा लागेल. स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदा द्विपाच्या परिसरात भूस्खलन ही त्सुनामी निर्माण झाली. त्यामुळे पँडेगलांग, सेरंग आणि दक्षिण लँपुंग या किनारपट्टीलगतच्या प्रदेशाला मोठा फटका बसला आहे. त्सुनामीमुळे समुद्रात तब्बल 15 ते 20 मीटर मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या. या त्सुनामीमुळे परिसरातील अनेक इमारती अक्षरश: जमीनदोस्त झाल्या आहेत. सध्या मदत यंत्रणांकडून या परिसरात बचावकार्य सुरु आहे.

इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर याच वर्षी झालेला भूकंप आणि त्सुनामी आली होती. शनिवारी रात्री आलेल्या त्सुनामीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. एका लाईव्ह कॉनर्स्टलाही त्सुनामीचा तडाखा बसल्याचा व्हिडिओ शेअर होत आहे.