"इसिस'च्या विरोधात तुर्कस्तानात छापासत्र

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

इस्तंबूल -  "इसिस'च्या जिहादी दहशतवाद्यांनी मागील महिन्यात इस्तंबूल येथील नाईट क्‍लबवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर तुर्कस्तानच्या पोलिस दलाने आज अनेक ठिकाणी छापे टाकून "इसिस'च्या शेकडो संशयित सदस्यांना ताब्यात घेतले आहे.

तुर्कस्तानातील वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, छापासत्रात सुमारे चारशे जणांना ताब्यात घेतले असून, ही "इसिस'विरोधातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले. राजधानी अंकार येथून 60 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यात विदेशी नागरिकांची संख्या मोठी आहे. सीरियाला लागून असलेल्या सीमाभागातूनही अनेकांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
 
Web Title: Turkey detains number of ISIS suspects in nationwide operation