तुर्कस्तानमध्ये हजारो नोकरदारांची हकालपट्टी

यूएनआय
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

इस्तंबुल - बंड घडवून आणल्याचा आरोप असलेल्या फेतुल्ला गुलेन या धर्मगुरुंशी संबंध असल्याचा आरोप ठेवत तुर्कस्तान सरकारने दहा हजार सरकारी नोकरदारांची हकालपट्टी केली. जुलैमध्ये सरकारविरोधात झालेले हे बंड फसले होते. त्यानंतर सरकारने अत्यंत कठोर कारवाई करत बंडाच्या पाठीराख्यांवर कारवाई करण्याची जोरदार मोहीम उघडली आहे.

आतापर्यंत येथील सरकारने बंडात सहभागी असल्याच्या आरोपावरून 37 हजार नागरिकांना अटक केली आहे, तर एक लाखांहून अधिक नोकरदार, न्यायाधीश, वकील, पोलिस आणि इतरांना नोकरीवरून काढून टाकले आहे. गुलेनचे "दहशतवादी जाळे' मुळापासून उखडून टाकण्यासाठी अशी कारवाई आवश्‍यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
 
Web Title: turky fires 10000 civil servants