यु ट्युब विरोधात 23 संस्थांची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

इंटरनेटवरील सगळ्यात जास्त पसंत केले जाणारे सर्च इंजिन यु ट्युब ही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अमेरीकेतील 23 संस्था सध्या यु ट्युबवर नाराज आहेत.

न्यूयॉर्क - फेसबुकच्या डेटा चोरी आणि डेटाचा गैरवापर या वादानंतर इंटरनेटवरील सगळ्यात जास्त पसंत केले जाणारे सर्च इंजिन यु ट्युब ही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अमेरीकेतील 23 संस्था सध्या यु ट्युबवर नाराज आहेत. या संस्थांनी तर यु ट्युब विरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रारही नोंदवली आहे. बालसुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप या संस्थानी केला आहे. 

यु ट्युबवर व्हिडीओ पाहणाऱ्या 13 वर्षांखालील मुलांकडून गुगल कंपनी त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करते. लोकेशन, डिव्हाईस, आयडेन्टिफायर्स आणि फोन नंबर अशी मुलांची माहिती याद्वारे गोळा केली जाते. त्यांना इतर वेबसाईट किंवा  सर्व्हिससाठी ट्रॅक केले जाते. अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे (Coppa) हे उल्लंघन असल्याचे या संस्थांच्या ग्रुपचे म्हणणे आहे. तक्रार केलेल्या संस्थांमध्ये कर्मशियल फ्री चाईल्डहूड आणि सेंटर फॉर डिजिटल डेमोक्रसी या महत्त्वाच्या संस्थांचा समावेश आहे. या 23 संस्था सजग ग्राहक आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी लढणाऱ्या संस्था आहेत. काही दिवसांपूर्वी फेसबुकही युजर्सची वैयक्तीक माहिती केम्ब्रिज अनॅलिटिका देत असल्याचा वाद निर्माण झाला होता. आता यु ट्युब वरही ही वादाची तलवार टांगली गेली आहे.   

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Twenty three institute files a complaint against You Tube