Twitterची नवी चाल... टेस्लाकडून होणाऱ्या टेकओव्हरसाठी 'डिफेन्स पॉलिसी'

Elon Musk
Elon Musksakal

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ट्विटरमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र आता या अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेला 'ग्रहण' लागल्याचं बोललं जातंय. यानंतर जागतिक बाजारात त्याचे पडसाद उमटू लागले. मस्क स्वत: संचालक मंडळात सहभागी होणार नसल्याचंही ट्विटरचे कार्यकारी संचालक पराग अग्रवाल यांनी सांगितलं. (Elon Musk)

मात्र आता आर्थिक पटलावर घडामोडींना वेग आला आहे. टेस्ला कंपनीच्या ऑफरपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ट्विटरने नव्याने उपाययोजना आखल्या आहेत. यासाठी ट्विटरने एक उपाय स्वीकारलाय. ज्यामुळे लिलावात लागणाऱ्या बोलीपासून त्यांना आर्थिक संरक्षण मिळेल. (Elon Musk Invests in Twitter)

Elon Musk
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क Twitter बोर्डमध्ये सामील होणार नाहीत

बोर्डाने भागधारकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी योजना तयार केली आहे. त्यानुसार जर एखाद्याने पूर्व मंजुरीशिवाय 15% स्टॉक घेतल्यास, त्याचा कालावधी फक्त एक वर्षासाठी असेल. यासंदर्भात शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय. खुल्या बाजारपेठेद्वारे ट्विटरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अन्य भागधारकांना योग्य प्रीमियम द्यावं लागेल. यासंदर्भात सर्व अटी आणि नियमांची सुनिश्चिती करण्याचा ट्विटरचा प्रस्ताव आहे.

Elon Musk
Elon Musk यांची Twitter विकत घेण्याची ऑफर गुंतवणुकदारांनी नाकारली

ट्विटरने स्वत:चा दबदबा अबाधित ठेवण्यासाठी ही खेळी खेळल्याचं काही तज्ञांनी सांगितलं आहे. यामुळे ट्विटर कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांकडे अमर्याद अधिकार येण्यावर निर्बंध येतील. या प्रकरणाशी परिचित असलेल्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ट्विटरने टेस्लासोबत होणाऱ्या करारात वेळकाढूपणा करण्यासाठी ही योजना लागू केली. ट्विटरचं संचालक मंडळ त्यांच्यासोबत होणाऱ्या कराराचं विश्लेषण करत आहे. त्यामार्फत येणाऱ्या काळात वाटाघाटी करण्यास ते आणखी सक्षम होऊ शकतील, असा गृहीत धरलं आहे.

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवारी ट्विटरसाठी $ 54.20 रोख रकमेची ऑफर दिली. ट्विटरचं मूल्य $ 43 अब्ज आहे. ही "सर्वोत्तम आणि अंतिम" ऑफर असल्याचे सांगणाऱ्या मस्क यांनी या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ट्विटरमध्ये 9% पेक्षा जास्त भागभांडवल जमा केलं आहे. मस्कच्या प्रस्तावाचं पुनरावलोकन करण्यासाठी ट्विटरच्या बोर्डाने गुरुवारी भेट घेतली. कंपनी आणि तिच्या सर्व भागधारकांच्या हितासंदर्भात कोणत्या गोष्टी निर्धारीत केल्या पाहिजे यासाठी संचालक मंडळाची बैठक पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com