ट्विटरचे सीईओ करताहेत विनावेतन काम!

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सॅन फ्रॅन्सिस्को : ट्विटरचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी सलग तिसऱ्या वर्षी म्हणजेच 2017 या संपूर्ण वर्षात कोणत्याही प्रकारचा पगार घेतला नाही. सलग तीन वर्ष ट्विटर चालवण्यासाठी त्यांनी एक रूपयाही घेतला नाही.      

'ट्विटरच्या दीर्घकालीन मूल्यनिर्मितीसाठी व विश्वासार्हता वाढविण्यासाठी जॅक डॉर्सी यांनी कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा मानधन घेतले नाही.' असे विधान सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनने केले. या उलट डॉर्सी यांचे ट्विटरमधील शेअर्स हे 2018 च्या सुरवलातीला 20 टक्क्यांनी वधारले आहेत. 2 एप्रिलला डॉर्सी यांनी ट्विटरचे 1 कोटी 80 लाखाचे शेअर्स विकत घेतले.

ट्विटरचे जगभरात 330 मिलियन युजर्स आहेत. ट्विटर कंपनी ही डॉर्सी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपर पावले उचलत आहे. कंपनीचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी दूरदृष्टीने काही निर्णय घेतले जात आहेत.  

डॉर्सी यांनी फक्त 2016 मध्ये राहण्यासाठी व काही वैयक्तीक खर्चासाठी मानधन घेतले होते. 

Web Title: Twitter CEO working without salary in 2017

टॅग्स