
Twitter पुन्हा डाऊन; युजर्स हैराण
एका महिन्यात ट्विटर पुन्हा डाऊन झालं आहे. लॉग इन करताना युजर्सना अडचण येत आहे.(Twitter Down Users Face Trouble Login In From Web)
downdetector.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळपासून 6.30 वाजल्यापासूनच हजारो लोकांनी ट्विटर डाऊन असल्याची माहिती दिली. त्याचदरम्यान ट्विटरसंदर्भात 433 तक्रारी आल्या. भारतातील अनेक युजर्सना वेबसाईट उघडण्यात अडचणी येत आहेत. मोबाइल देखील अॅप कार्यरत करत नाही.
हेही वाचा: Winter Session : सीमावासीयांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र विभाग - एकनाथ शिंदे
नेमकी काय येतीय अडचण?
युझर्सना डेस्कटॉप किंवा लॅपटॉवरून लॉग इन करताना एरर मेसेज येत आहे. तसंच पुन्हा एकदा लॉग इन करण्यास सांगितलं जात आहे. परंतु पुन्हा लॉग इनचा प्रयत्न केल्यानंतर अन्य सर्व पर्याय गायब होत असल्याची समस्या दिसून येत आहे.
हेही वाचा: Maharashtra Politics : तुमच्या कर्तृत्वाला सलाम, फक्त....; ठाकरे गटाचं शिंदे गटाला चॅलेंज
पहिल्यांदा लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर “Something went wrong, but don’t fret — it’s not your fault. Let’s try again. असा मेसेज येत आहे.