बेपत्ता बोटीतील दोघे सापडले

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

क्वालालंपूर : मलेशियाच्या बेपत्ता झालेल्या बोटीचा कॅप्टन आणि एक कर्मचारी आज सुरक्षितपणे सापडले असून बोटीवरील इतर 31 प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत.

क्वालालंपूर : मलेशियाच्या बेपत्ता झालेल्या बोटीचा कॅप्टन आणि एक कर्मचारी आज सुरक्षितपणे सापडले असून बोटीवरील इतर 31 प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत.

प्रवाशांपैकी बहुतेक जण चिनी पर्यटक आहेत. बोटीचा कॅप्टन आणि कर्मचारी हे आज बचाव पथकाला दुपारी एका बेटाजवळ समुद्रात तरंगत असल्याचे आढळले. या बोटीने शनिवारी (ता. 28) सकाळी मलेशियाचा किनारा सोडत तेथून जवळच असलेल्या एका बेटाकडे प्रवास सुरू केला होता. मात्र, बोट बेपत्ता झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर मलेशियाने शोधमोहीम सुरू केली. या बोटीला झालेल्या अपघाताबाबत आणि बेपत्ता प्रवाशांबाबत कॅप्टन आणि कर्मचाऱ्यांकडे विचारणा सुरू आहे.

Web Title: two found from missing boat in malayasia