'टॉप टेन' छायाचित्रांमध्ये भारतीयांची बाजी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

वॉशिंग्टन - नॅशनल जिओग्राफीकतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या 'नेचर फोटोग्राफर ऑफ द इअर' या छायाचित्रांच्या स्पर्धेत यंदा दोघा भारतीयांनी बाजी मारली आहे. 'टॉप टेन' छायाचित्रांमध्ये या दोघांच्या छायाचित्रांची निवड झाली असुन, माहाराष्ट्राच्या वरुण अदित्यच्या छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

छायाचित्रांच्या या स्पर्धेचे निकष चांगलेच कडक होते. त्यासाठी 12 आठवडे स्पर्धकांच्या छायाचित्रांचा अभ्यास केला गेला. त्यानंतर विजेत्या छायाचित्रांची निवड करण्यात आली. यामध्ये 'ऍनिमल पोट्रेट' प्रकारात वरुण अदित्यचे छायाचित्र निवडले गेले, तर 'लॅंडस्केप' प्रकारात प्रसेनजीत यादवच्या छायाचित्राला पोचपावती मिळाली आहे.

'ड्रॅगिंग यू डीप इनटू द वूड्स' असे नाव देताना  वरुणने एका 20 सेंटिमीटर लांबीच्या हिरव्या सापाचे अप्रतिम छायाचित्र काढले आहे. याच छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

छायाचित्र सौजन्य -  National Geographic 

Web Title: Two Indians won in National Geographic ‘Nature Photographer Of The Year’,