इसिसचे इराकमध्ये दोन हल्ले; 14 ठार

रॉयटर्स
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

बगदाद- इस्लामिक स्टेट तथा इसिस या दहशतवादी संघटनेने इराकची राजधानी बगदादमध्ये घडवून आणलेल्या दोन कार-बाँबस्फोटांमध्ये किमान 14 जण मृत्युमुखी पडले. 

पहिला बाँबस्फोट बगदादच्या पूर्व अल-ओबिदी भागात सकाळच्या रहदारीच्या वेळी झाला. त्यामध्ये सहाजण मारले गेले, तर 15 जण जखमी झाले. 'येथील शिया मुस्लिमांच्या बैठकीत बाँबस्फोट घडविण्याचे आमचे लक्ष्य होते,' असे इसिसने ऑनलाईन प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. इसिस हे शिया मुस्लिमांना धर्मविरोधी (काफर) मानते. 

बाब-अल-मोधाम येथील सुरक्षा तपासणी नाक्याजवळ दुसरा बाँबस्फोट घडवून आणला. त्यामध्ये आठजण मृत्युमुखी पडले. हे दोन्ही बाँब वाहनतळांवर लावलेल्या गाड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. 
 
Web Title: Two Islamic State car bombs in Baghdad kill at least 14