युगांडा सर्वांत उत्साही देश ; कुवेत सर्वांत आळशी

Uganda is the most ardent country Promptly sluggish in Kuwait
Uganda is the most ardent country Promptly sluggish in Kuwait

न्यूयॉर्क : ज्या देशातील नागरिक आळशी असतात, तो देश कधी प्रगती करू शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. याउलट ज्या देशातील नागरिकांमध्ये अचाट उत्साह असतो, अशा देशांचा विकास झाल्याशिवाय राहात नाही. हे चीन, जपानसारख्या पुढारलेल्या देशांवरून दिसून येते. अशाच देशांबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) एक पाहणी केली असून, त्यात युगांडा सर्वांत उत्साही, तर कुवेत सर्वांत आळशी देश असल्याचे समोर आले आहे. 

"डब्लूएचओ'ने यासाठी 156 देशांतील सुमारे 19 लाख व्यक्तींची पाहणी केली. याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. दररोज 75 मिनिटे किंवा आठवड्यातून 150 मिनिटे व्यायाम करणारी व्यक्ती सक्रिय असते, असे "डब्लूएचओ'चे म्हणणे असून, या मुख्य निकषानुसार केलेल्या पाहणीत जगात प्रत्येक चार व्यक्तींमागे एक व्यक्ती नियमित व्यायाम करीत नसल्याचे आढळून आले. याबाबतीत कुवेतमधील 67 टक्के नागरिक असे आहेत. जे पुरेसा व्यायाम किंवा हालचाली करीत नाहीत. त्यापाठोपाठ इराक, अमेरिकन सामोआ, ब्राझिलमध्ये आळशी लोकांचे प्रमाण मोठे असल्याचे "डब्लूएचओ' म्हटले आहे. 

भारत 117 व्या क्रमांकावर 

जगभरात योगाला ओळखून मिळवून देणारा भारत या यादीत 117 व्या स्थानी असून, भारताच्या तुलनेत अमेरिका (143), ब्रिटन (123), सिंगापूर (126), ऑस्ट्रेलिया (97) या देशातील नागरिक अधिक आळशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानही याबाबतीत भारताच्या खूप मागे आहे. 

सर्वांत उत्साही देश 

- युगांडा ः 5.5 
- मोझांबिक ः 5.6 
- लिसोथो ः 6.3 
- टांझानिया ः 6.5 
- नियू ः 6.9 
- वनुआतू ः 8 
- टोगो ः 9.8 
- कंबोडिया ः 10.5 
- म्याणमार ः 10.7 
-टोकेलावू ः 11.1 

सर्वांत आळशी देश 

- कुवेत ः 67 
- अमेरिकन सामोआ ः 53.4 
- सौदी अरेबिया ः 53 
- इराक ः 52 
- ब्राझिल ः 47 
- कोस्टा रिका ः 46.1 
- सायप्रस ः 44.4 
- सुरीनाम ः 44.4 
- कोलंबिया ः 44 
- मार्शल द्वीप ः 43.5 
(नियमित व्यायाम न करणाऱ्यांचे प्रमाण टक्‍क्‍यांमध्ये) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com