युगांडात बोट उलटून फुटबॉल खेळाडूंसह 30 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

बोटीवर स्थानिक फुटबॉलपटू व त्यांचे चाहते दारु पिऊन नृत्य करत असताना बोल उलटली. या दुर्घटनेत 30 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे.

किटबेर (युगांडा) - युगांडामधील वेस्टर्न बुलिसिया जिल्ह्यात असलेल्या लेक अल्बर्ट तलावात बोट उलटून स्थानिक फुटबॉल खेळाडूंसह 30 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पोलिस कमांडर जॉन रुतागिरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवर स्थानिक फुटबॉलपटू व त्यांचे चाहते दारु पिऊन नृत्य करत असताना बोल उलटली. या दुर्घटनेत 30 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर राबवून 15 जणांना वाचविले. तर, मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने ती पलटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बोटीच्या एका बाजूलाच हे सर्वजण नृत्य करत होते. होमिया संघाविरुद्ध फुटबॉल सामना जिंकल्यानंतर हे सर्व आनंद व्यक्त करत होते. गेल्या तीन दिवसांत युगांडामध्ये दुसऱ्यांदा बोट उलटल्याची घटना घडली आहे. लेक व्हिक्टोरियामध्ये बोट उलटून 20 जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Ugandan football players and fans drown on Lake Albert as 30 die when party boat capsizes