भारत-अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही दिला चीनला दणका

सुशांत जाधव
Monday, 20 July 2020

ब्रिटनने 5G नेटवर्कमधून चिनी हुवावेचं उपकरण 2027 पर्यंत वापरणार नसल्याची घोषणा केली होती.   

टोकियो : ब्रिटन सरकारने 5G वायरलेस नेटवर्क विकसित करण्यासाठी जपानची मदत मागितली आहे. यापूर्वी 5G नेटवर्कचे ब्रिटनमधील काम हे चीनच्या हुवावेकडे होते. Huawei वर बंदी घालत ब्रिटनने त्यांना पहिला दणका दिला होता. त्यानंतर आता जपानसोबत बोलणी सुरु करुन 5G नेटवर्कसंदर्भात चीनसोबत कोणतीही चर्चा करण्याचा प्रश्नच उरलेला नाही याची पुष्टीच ब्रिटनने दिली. ब्रिटनसह अमेरिकेतही हुवावेवर बंदी घालण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन यांच्यात टेक्नॉलजी आणि  सुरक्षेसंदर्भात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीला जबाबदार असल्याच्या आरोपानंतर चीनवर संकटावर संकट येताना दिसत आहेत.  5G नेटवर्कसंदर्भात ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच जपानच्या  अधिकाऱ्यांची भेट घेतली. दोन्ही गटातील अधिकाऱ्यांची टोकियोत बैठक पार पडली.  

वीरप्पनच्या मुलीचे समाजसेवेचे स्वप्न

ब्रिटनने 5G नेटवर्कमधून चिनी हुवावेचं उपकरण 2027 पर्यंत वापरणार नसल्याची घोषणा केली होती. याशिवाय अमेरिकेनेही हुवावे उपकरणाच्या वापरावर बंदी घालत चीनची कोंडी केली आहे. हुवावेवरील अमेरिकेती बंदीमुळे संबंधित कंपनी गुगल सेवेचा वापर अशक्य झालाय. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर चीन एकाकी पडताना दिसत आहे. भारतामध्येही चीन विरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहे. लडाख सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीनंतर भारताने चिनी कंपन्यांची 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि भारताने घेतलेल्या निर्णयामुळे चीनला चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.  

अरे बापरे! देशात तब्बल एवढी कर्जवसुली थकलेली आहे; पहा किती आहे​

5G ची खासियत 

5G सेवेत 4G नेटवर्कच्या तुलनेत 20 पट अधिक स्पीड शक्य आहे. 1 एचडी मुव्ही केवळ एका सेकंदात डाउनलोड होऊ शकते, यावरुन तुम्ही 5G स्पीड किती असेल याचा अंदाज लावू शकता. गर्दीच्या ठिकाणीही 5G वापरकर्त्यांना 3G आणि 4G प्रमाणाे नेटवर्क समस्या भेडसावणार नाही. एक पॉइंटवरुन दुसऱ्या पॉइंटला डेटा पोहचण्यासाठी जो वेळ लागतो त्याला 'लेटेंसी' असे म्हणतात. 5G चा  लेटेंसी रेट 1 मिलिसेकंद असेल. 4G नेटवर्कचा हा रेट 10 मिलिसेकंद इतका आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uk asks japan to help develop 5g network